बँक आँफ महाराष्ट्र शाखा कोवाडचा देशात दुसरा क्रमांक, व्यापारी संघटनेकडून कर्मचाऱ्यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2021

बँक आँफ महाराष्ट्र शाखा कोवाडचा देशात दुसरा क्रमांक, व्यापारी संघटनेकडून कर्मचाऱ्यांचा सत्कार

बँक आँफ महाराष्ट्र शाखा कोवाड च्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना कोवाड व्यापारी संघटना

तेऊरवाडी -सी .एल . वृत्तसेवा 

बँक आँफ महाराष्ट्र शाखा कोवाड ( ता. चंदगड ) या शाखेनेबँकेच्या 87 व्या वर्धापनदिनानिमीत्त भरवण्यात आलेल्या कँपेन स्पर्धामध्ये दुसरा क्रमांक पटकविल्याने कोवाड व्यापारी संघटनेच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

ही स्पर्धा संपुर्ण भारत देशात घेण्यात आली होती . त्यापैकी देशातील 611 ग्रामीण विभाग शाखामधुन बँक आँफ महाराष्ट्र शाखा कोवाड ने दुसरा नंबर पटकावून कोवाडचा नावलौकिक वाढवला .याबद्दल कोवाड व्यापारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष दयानंद सलाम व सर्व सदस्यानी मँनेंजर कुलदीप चौगुले, श्री .सौदागर ,एस आर पाटील , श्री देसाई व परशराम कांबळे या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी व्यापारी संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम,उपाध्यक्ष कल्लाप्पा वांद्रे,बापू व्हन्याळकर ,सुधीर जाधव,चंद्रकांत कुंभार , सचीन पाटील ,गुलाब पाटील, जोतीबा पाटील ,हणमंत पाटील, नरसिंग पाटील, नारायण पाटील, नागोजी पाटील ,सोमशेखर मिश्रकोटी आदम मुल्ला,विनायक पोटेकर, विक्रम पेडणेकर यांच्या बरोबर बँकेचे सभासद उपस्थित होते.


No comments:

Post a Comment