काजिर्णे - म्हाळूंगे ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छता हीच सेवा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2021

काजिर्णे - म्हाळूंगे ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छता हीच सेवा उपक्रम

ग्रुप ग्रामपंचायत काजिर्णे - म्हाळुंगे येथे स्वच्छता हीच सेवा उपक्रमाचा शुभारंभ करताना मान्यवर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        ग्रुप ग्रामपंचायत काजिर्णे - म्हाळुंगे (ता. चंदगड) येथे आज," स्वच्छता हीच सेवा " हा उपक्रम  १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत होणार असून त्याची सुरवात आज पंचायत समितीचे सभापती अँड. अनंत कांबळे यांच्या  हस्ते करण्यात आले.

        यावेळी पंचायत  पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे  ग्रामपंचायत  काजिर्णे म्हाळुंगेच्या सरपंचा नम्रता नामदेव पाटील, उपसरपंचा लक्ष्मी परशराम उफळकर, गटसमन्वयक किरण पाटील, समूह गट समन्वय श्री. पारधी, भाजप तालुका अध्यक्ष नामदेव पाटील, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन गावडे, ग्रा. प. सदस्य रवळनाथ गावडे, ग्रा. प. सदस्य नंदा  गावडे, ग्रां. प. स. लक्ष्मी  गावडे, तंटामुक्त अध्यक्ष देवदास  पाटील, ग्रामसेवक पुंडलिक राऊत, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. नाईक, शिपाई परशराम कानुरकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment