बांधकाम कामगारांना तडशिनहाळ कार्यालयातून शनिवारपासून मध्यान्ह भोजन सूरू - अध्यक्ष कल्लाप्पा निवगिरे - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2021

बांधकाम कामगारांना तडशिनहाळ कार्यालयातून शनिवारपासून मध्यान्ह भोजन सूरू - अध्यक्ष कल्लाप्पा निवगिरे


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्यातील बांधकाम कामगारांना तडशिनहाळ (ता. चंदगड)  येथील चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोशिएन या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई ह्या मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगारांना मोफत मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ उद्या दि. १८/९/२०२१ पासून दुपारी १.०० वाजता संघटनेच्या तडशिनहाळ फाटा कार्यालयातुन सुरु करण्यात येणार आहे. चंदगड तालुक्यातील बांधकाम कामगारांनी उद्या ठिक १.०० वाजता संघटनेच्या तडशिनहाळ फाटा येथील कार्यालयात हजर राहून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कल्लापा निवगिरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment