जे पाहतो तेच पेन्सीलने कागदावर उतरवतो, माणगांव येथील हरहुन्नरी नवोदित चित्रकार, कोण आहे हा कलाकार, वाचा......... - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2021

जे पाहतो तेच पेन्सीलने कागदावर उतरवतो, माणगांव येथील हरहुन्नरी नवोदित चित्रकार, कोण आहे हा कलाकार, वाचा.........

 

तोहिद मुल्ला

तेऊरवाडी (एस .के. पाटील )

          चित्रकला हा कलेचा एक प्रकार आहे. मानवी सर्जनशीलतेचा अविष्कार या चित्रकलेतून दिसतो. माणगाव (ता. चंदगड) येथील तोहिद मुल्ला या नवोदित हरहुन्नरी चित्रकाराने कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नसतानाही केवळ  पेन्सिलचा वापर करून काढलेली चित्रे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो.

तोहिदने काढलेली काही चित्रे....

        चित्रकलेचा इतिहास अतिशय पुरातन आहे .लिओनार्डो -द- व्हीन्सी, रॅफेल, मायकेल अँजेलो, राजा रवी वर्मा इत्यादी महान चित्रकार ऐतिहासिक कालखंडात होऊन गेले. चित्रकला त्यांच्या बाबतीत प्रेरणादायी शक्ती होती. त्यांच्या चित्रातून त्यांचे कलासामर्थ दिसून येत होते. पण आताच्या या डिजिटल युगात विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये युवक वर्ग गुंतला असताना अशा चित्रकलेसारख्या कला कोण जापासणार? प्रत्येक युवक मोबाईलच्या विळख्यात. पण माणगाव येथील या तोहिद ने चित्रकलेचा छंद जोपासला आहे तोही मनापासून. श्री छ. शिवाजी हायस्कूल माणगांव येथे शिकत असताना तोहिदला चित्रकलेची आवड निर्माण झाली. त्यानंतर हलकर्णी महाविद्यालयात या कलेचा प्रचंड छंद लागला. हातात पेन्सिल घेऊन भरभर एकामागोमाग कार्ड सीटवर चित्र रेखाटली जाऊ लागली. मग द रॉक, दिपिका पदुकोन, टायगर श्राफ, रणबिर कपूर, सोहिल शेख खान, ऋतिक रोशन, किर्ति शेट्टी, नवाझूदृीन सिद्धीकी अशी एकामागोमाग एक चित्र रेखाटली आहेत. केवळ पेन्सिल हातात धरून काढलेली चित्रे बोलकी वाटतात. चित्रात जीव ओतू पाहणारा हा माणगांवचा नवोदित कलाकार खरचं कौतुकास पात्र आहे. चंदगड लाईव्ह न्यूज कडून तोहिदला शुभेच्छा.

No comments:

Post a Comment