डोणेवाडीतील हलत्या देखाव्याची २० वर्षाची परंपरा, गाव छोटे पण गणपती मोठे - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2021

डोणेवाडीतील हलत्या देखाव्याची २० वर्षाची परंपरा, गाव छोटे पण गणपती मोठे

डोणेवाडी : भिमराव नाईक यांनी साकारलेला सीताहरणाचा पौराणिक गणेश देखावा.

तेऊरवाडी  / एस. के. पाटील

        येथूनच जवळ असलेल्या डोणेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील हौशी  गणेशभक्त भिमराव गुंडू नाईक यांनी  घरगुती गणेशासमोर सीताहरण लक्षवेधी पौराणिक हलता देखावा  साकारला आहे. या छोट्याश्या गावात घरगुती गणपती मात्र मोठे आहेत. गेल्या २० वर्षापासूनची हलत्या देखाव्यांची परंपरा मात्र कायम आहे.

       भिमराव यानी आकर्षक विद्युत रोषणाई,  नैसर्गिक झाडे, पिकांचा अधिक वापर करुन आरास सजविला आहे. राम, सीता,  लक्ष्मण,  रावण, राक्षस, हरण या हलत्या चित्रांची आकर्षक मांडणी केली आहे. श्री नाईक यांचा देखावा भाविकांसाठी खुला झाला आहे.  हेळेवाडीतील  गणेश मुर्तीकार नारायण सुतार यांनी बनवलेल्या सहा फुटी गणेशमूर्तीची प्रतिष्ठास्थापना  केली  आहे.  गेल्या वीस वर्षापासून आकर्षक गणेश देखावा साकारण्याची  परंपरा नाईक यांनी जोपासली आहे. पौराणिक प्रसंग देखाव्याच्या माध्यमातून साकारून पौराणिक संस्कृती जतन  करण्याचे काम नाईक करत आहे.  देखावा सजवण्यासाठी निसर्गातील विविध झाडे, पिके, वेली यांचा अधिक वापर करून नैसर्गिक पद्धतीने देखावा समजवण्यावर नाईक यांचा अधिक भर असतो. बारा दिवस  गणपती  पूजला जातो.  दरवर्षी गणेशोत्सवामध्ये  ते सुमारे चाळी ते पन्नास हजार रूपये मोठ्या भक्तिभावाने खर्च करतात.  यांचा आदर्श घेऊन गावातील काही तरुण विविध देखावे साकारून भाविकांना आकर्षित करत आहेत. त्यानी यापूर्वी राजा पंढरीचा,  श्रीकृष्ण जन्म, बाळूमामा,  शेतकरी,  घोडा रिंगण,  ज्ञानेश्वर भिंत चालवणे, लवकुश,  राम भजन, रामायण, महाभारतातील अनेक प्रसंग देखाव्यांच्या माध्यमातून साकारले आहेत. सीताहरण देखावा पाहण्यासाठी हडलगे, तारेवाडी, सांबरे, तावरेवाडी आदी गावातील गणेश भक्त  येतात. कोरोना पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेत  गणेशाचे भाविक दर्शन घेतात अशी माहिती भिमराव य यांनी दिली. याबरोबरच येथील रमेश नाईक, बाळू नाईक, विजय नाईक यांनी सुद्धा आकर्षक सजावट करून गणेश पूजन केले आहे.

          गेल्या वीस वर्षापासून सातवणे येथील मित्रमंडळींच्या प्रेरणेतून घरगुती गणेश देखावा साकरण्याची परंपरा जोपासली आहे. नविन पिढीला भक्तीमार्गाची जाणीव व्हावी या उद्देशाने गणेशासमोर धार्मिक, पौराणिक प्रसंगाबरोबरच रामायण, महाभारतील अनेक प्रसंग उभारण्यावर अधिक भर असतो.  भीमराव गुंडू नाईक,  गणेश भक्त डोणेवाडी. 

No comments:

Post a Comment