प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना 'कॉफी पेन्ट'च्या सहाय्याने चित्र रेखाटून वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2021

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना 'कॉफी पेन्ट'च्या सहाय्याने चित्र रेखाटून वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

काॅफीचा पेन्ट बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अजित औरवाडकर यांनी रेखाटलेले चित्र

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त बेळगाव येथील कलाकाराने 'कॉफी पेंन्ट' मधून शुभेच्छा दिल्या. 

बेळगाव येथील चित्रकार अजित महादेव औरवाडकर

   वडगाव-बेळगाव येथील सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित महादेव औरवाडकर यांनी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिण्याच्या कॉफी चा वापर करून मोदी यांचे भावचित्र रेखाटले. ही कलाकृती पाहण्यासाठी भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, कलारसिक व नागरिकांनी मोठी गर्दी केली. ही कलाकृती नाझर कॅम्प, यळ्ळूर रोड, माधवपूर- वडगाव बेळगाव येथील ज्योती स्टुडिओत पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहे.

         अजित यांनी विविध दिनविशेषांचे औचित्य साधून यापूर्वी १२५ रांगोळी कलाकृती तसेच नाविन्यपूर्ण साधनांचा वापर करून रेखाटलेल्या इतर कलाकृतींनी मोठी वाहवा मिळवली आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, लता मंगेशकर, सनई वादक बिस्मिल्ला खान, वल्लभभाई पटेल, बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, एपीजे अब्दुल कलाम, अण्णा हजारे आदी नेते, देशभक्त, क्रांतिकारक, कलाकारांच्या तसेच बेटी बचाव बेटी पढाव, अंधश्रद्धा निर्मूलन विषयक सामाजिक प्रश्नावरील रांगोळ्या कलाप्रेमी रसिकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कॉफी चा वापर करून काढलेली ही पहिलीच कलाकृती त्यांच्यातील कलात्मकतेचा दर्जा दाखवून देणारी ठरली आहे.

No comments:

Post a Comment