मलगेवाडी येथे कोरोना लसिकरणावेळी उपस्थित कर्मचारी |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
प्राथमिक आरोग्य केंद्र अडकुर अंतर्गत शनिवार दि. १८ रोजी विद्यामंदिर मलगेवाडी शाळेत लसीकरण करण्यात झाले.
शाळेचे मुख्याध्यापक महादेव बाळू नाईक यांनी स्वागत केले. लसीकरणाचे महत्व आशा वर्कर सौ. जाधव यांनी सांगितले. आभार अध्यापिका श्रीम. राऊत यांनी मानले. आरोग्य सेवक श्री. क्षीरसागर, आरोग्य सेविका सौ. गुरव यानी लसीकरण केले. यावेळी पोलीस पाटील डी. एस. पाटील शाळा व्यवस्थापन अध्यक्ष एल. एम. पाटील, सुरेश कबाडे, अंगणवाडी सेविका सौ. लता पाटील, मिनी अंगणवाडी सेविका श्रीम. निर्मला ताम्हनगोंडे, सौ. शीतल गुडुळे आणि लाभार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment