अश्लील चित्रीकरण करून महिलेसोबत जबरी संबंध करणाऱ्या कोदाळी येथील युवकाला अटक - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2021

अश्लील चित्रीकरण करून महिलेसोबत जबरी संबंध करणाऱ्या कोदाळी येथील युवकाला अटक

 


चंदगड / प्रतिनिधी

        अश्लील चित्रीकरण करून महिलेसोबत जबरी संबंध करणाऱ्या सत्यवान शंकर गावडे (वय ३५ वर्ष) (रा. कोदाळी ता. चंदगड) या संशयित युवकाला चंदगड पोलिसांनी अटक केली. त्याला चंदगड येथील न्यायालयात हजर केले न्यायाधीश ए. सी. बिराजदार यांनी २७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली.

  यासंदर्भात पोलिसातुन मिळालेली माहिती अशी की, सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका महिलेसोबत संशयीत आरोपी सत्यवान गावडे याने ओळख वाढवली. ओळखीतून सदर महिलेसोबत अश्लील चित्रीकरण करून तो व्हिडीओ व्हायरल केला. तसेच पिडीत महिलेला धमकी देऊन तिचे सोबत जबरी संबंध ठेवले. पिडीत महिलेने सत्यवान गावडे याचे विरोधात चंदगड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गून्हा नोंद करण्यात आला असून गावडे याला अटक केले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर, पो. हे. काॅ रावसाहेब कसेकर करत आहेत.



No comments:

Post a Comment