दिवसाढवळ्या हिरो होंडा दुचाकी लंपास! कोठे घडली घटना - चंदगड लाईव्ह न्युज

25 September 2021

दिवसाढवळ्या हिरो होंडा दुचाकी लंपास! कोठे घडली घटना


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

  चार दिवसापूर्वी कालकुंद्री (ता. चंदगड) येथील कल्लाप्पा भरमू मुतकेकर यांची हिरो होंडा स्प्लेंडर चोरट्यांनी दिवसाढवळ्या लंपास केली. कर्यात भागात दीड दोन वर्षानंतर दुचाकी चोरांनी पुन्हा डोके वर काढल्याने दुचाकी मालकांची चिंता वाढली आहे.

      याबाबत अधिक माहिती अशी, मुतकेकर हे शेतकरी असून होसूर ओढा परिसरातील शेतात जनावरांना वैरण आणण्यासाठी गेले होते. पण चिखलामुळे त्यांच्यासह परिसरातील अन्य शेतकरी आपल्या दुचाकी गाड्या बेळगाव मार्गावरील कल्याणपूर फाटा ते बुक्कीहाळ फाटा दरम्यान रस्त्याकडेला नेहमीप्रमाणे गाडी हँडल लॉक करून गेले होते. येऊन पाहतात तो गाडी गायब झाल्याचे समजले. सकाळी आठ नऊ च्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे रस्त्यालगत गाड्या लावून वैरण आणण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याच ठिकाणी दोन वर्षापूर्वी मोसिन अब्दुल मोमीन, कालकुंद्री यांची चोरीला गेलेली गाडी अद्याप सापडलेली नाही. कल्लाप्पा मुतकेकर यांना ही स्प्लेंडर गाडी (एम एच ०९ बीजी ५९८९) काही वर्षापूर्वी त्यांचे सासरे मारुती गोपाळ मोरे सुंडी, ता. चंदगड यांनी खरेदी करून वापरण्यासाठी दिली होती. तथापि गाडीचे मूळ मालक मोरे यांचे निधन झाले असल्यामुळे चंदगड पोलिसांनी घटनेची नोंद करून घेण्यास असमर्थता दर्शवल्याचे समजते.

No comments:

Post a Comment