विशेष ग्रामसभेतपूर्वीच उमगांवचे सरपंच सुतार यांचा राजीनामा - चंदगड लाईव्ह न्युज

04 September 2021

विशेष ग्रामसभेतपूर्वीच उमगांवचे सरपंच सुतार यांचा राजीनामा

 


चंदगड / प्रतिनिधी 

        उमगांव (ता. चंदगड) येथील ग्रुप ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच गणपती कृष्णा सुतार यानी निवडणुक होण्यापूर्वीच आपल्या पदाचा सभापती ॲड अनंत कांबळे यांचे कडे राजीनामा सुपूर्त केला. त्यामुळे ८ सप्टेंबर रोजी होणारी सरपंच निवडणुक स्थगित झाली. १५मार्च रोजी  आठ सदस्यांनी सुतार यांचे विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता.तो आठ विरूध्द एक मताने मंजूर झाला होता.

       मौजे उमगांव येथील २०१७ ते २०२२ या पंचवार्षिक निवडणुकीत स्थानिक महाविकास आघाडी कडून निवडणुक लढवुन सुतार हे पहिले थेट सरपंच म्हणून निवडून आले होते.  सुरूवातीला याच आघाडीतील काही भ्रष्ट  प्रवृत्तीच्या लोकाकडून गुपग्रामपंचायत मधील बेकायदेशीर कामे करण्यासाठी  दबाव वाढू लागला व प्रसंगी आपणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तसेच माझ्या कुटुंबाला मानसिक व शारिरिक त्रास देण्यात आला. त्यामुळे सदर  प्रवृत्तीच्या व्यक्तीवर आपण चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला व आघाडीच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून विरोधी भाजपा आघाडीत  मध्ये प्रवेश केला. गेली तीन वर्षे ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीतपणे करणेचा प्रयत्न केला. सत्ताधारी आघाडीकडे ९ पैकी ८ सदस्य असल्याने आपण केलेल्या कामांना विरोध करून गेली तीन ते साडे तीन वर्षे गावामध्ये दंगे मारामा-या व खोटया केसेस करून लोकांना त्रास देऊन या आघाडीतील काही लोकांनी गावातील शांतता भंग केली आहे. तसेच गावाच्या विकासाला खिळ घातली आहे व संख्याबळाचा गैर वापर करून माझ्यावर अविश्वास ठराव केला आहे. तसेच अविश्वास ठरावाची निवडणुक लावली आहे. पण सध्या कोवीड २०१९ या महामारीचा विचार करून व ग्रामपंचायतीचा अनावश्यक खर्च टाळणेसाठी व ग्रामपंचायतील सर्व मतदारांच्या त्रासाचा विचार करून आपण स्वतः  सभापती पंचायत समिती चंदगड यांचेकडे दि. ०३ / ० ९ / २०२१ रोजी माझ्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे.


अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सरपंच निवडणुक घेण्यासाठी बुधवार दि.८ सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. होते, मात्र त्याआधीच ३ सप्टेंबर रोजी सरपंंच सुतार यांनी राजीनामा दिल्याने आता विशेष ग्रामसभेची गरज नसल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी सांगितले. 


 आठ विरूध्द एक मताने ठराव मंजूर 

उमगाव (ता. चंदगड) येथील ग्रूप ग्रामपंचायती चे सरपंच गणपती कृष्णा सुतार यांचे विरोधात १५मार्च २१रोजी दाखल झालेला ठराव आठ विरूध्द एकत्र मताने मंजूर झाला होता. तहसीलदार विनोद रणवरे याच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणे,अवास्तव खर्च करणे,खर्चाचा हिशेब न देणे,आपल्या मर्जीप्रमाणे प्रोसीडीग लिहीणे,स्वताःच्या मूलाला कामगार बनवणे असे आरोप सरपंंच सुतार याचेवर ठेऊन उपसरपंच रूक्माना गावडे,महेश गावडे,लक्ष्मण गावडे,दत्तात्रय सूतार सूप्रिया गावडे,लक्ष्मी गावडे,अपूर्वा पेडणेकर,रंजना कांबळे आदी सदस्यांनी  अविश्वास ठराव दाखल केला होता. यावेेळी आठ सदस्यांनी हात उंचावून सरपंच सूतार यांच्या विरोधात मतदान केल्याने ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी पार्वती देवळी या महीला सदस्या तटस्थ राहील्या होत्या.



No comments:

Post a Comment