चंदगड / प्रतिनिधी
आजरा येथील रवळनाथ को ऑप हाऊसिंग फायनान्स सोसायटीतर्फे (मल्टी स्टेट) चंदगड तालुक्यातील सभासदाकरिता मंगळवार दि.७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते २.३० या कालावधीत सभासद प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केल्याची माहीती संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली."बहुराज्य सहकारी कायदा-२००२ नुसार सभासदांचे अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदारी" आणि कोविड-१९ चा मल्टी-स्टेट सहकारी संस्थेवरील परिणाम या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन विभागिय उपनिबंधक (सहकारी संस्था) अरूण काकडे यांच्या हस्ते होणार असून तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षक प्रा. संभाजी जाधव व सहकारी अधिकारी डॉ. मच्छिंद्र मुरूडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षणाचा लाभ संस्थेच्या तालुक्यातील सभासदांनी घ्यावा असे आवाहन शाखाध्यक्षा सौ. पुष्पा नेसरीकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment