मराठा सेवा संघाचा वर्धापन दिनानिमित्त कडगाव येथे शहाजीराजे फाउंडेशनच्या उपक्रमांचे लोकार्पण - चंदगड लाईव्ह न्युज

06 September 2021

मराठा सेवा संघाचा वर्धापन दिनानिमित्त कडगाव येथे शहाजीराजे फाउंडेशनच्या उपक्रमांचे लोकार्पण

मराठा सेवा संघाचा वर्धापन दिनानिमित्त कडगाव येथे शहाजीराजे फाउंडेशनच्या उपक्रमांचे लोकार्पण झाले. 


गारगोटी : सी. एल. वृत्तसेवा

    कडगाव (ता. भुदरगड) येथे मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त मराठा सेवा संघ प्रणित शहाजीराजे फाउंडेशन कडगाव, संचलित स्वराज्य रक्षक शंभूराजे वाचनालय, संत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती केंद्र आणि राजमाता जिजाऊ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अशा समाजोपयोगी उपक्रमांचे लोकार्पण झाले. बिद्री साखर कारखान्याचे संचालक  धनाजीराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती भुदरगड चे माजी उपसभापती सत्यजित जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

     प्रास्ताविक मराठा सेवा संघ प्रणित डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद प्राथमिक जिल्हाध्यक्ष शहाजी देसाई यांनी केले. स्वागत अविनाश धबधबे यांनी केले. ज्या कामांची अपेक्षा शासनाकडून असते त्याची पूर्तता शहाजीराजे फाउंडेशन करत असल्याचे गौरवोद्गार धनाजीराव देसाई यांनी काढले. उद्घाटक जाधव म्हणाले शहाजी देसाई यांच्या कल्पकता व पदरमोडीतून साकारलेल्या वाचनालय व्यसनमुक्ती केंद्र व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून सक्षम भावी पिढी निर्माण होईल असे विचार व्यक्त केले.

          यावेळी शहाजी देसाई  लिखित  'समाज जोडणारा हळवा युगपुरुष'  या मराठा सेवा संघ संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या जीवन कार्यावर आधारित ग्रंथाचे प्रकाशन झाले.

     कार्यक्रमास कडगावचे उपसरपंच शहाजी देसाई, भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष बाजीराव देसाई, शिवसेनेचे गणेश देसाई, चर्मकार समाज संघ राज्य सदस्य नारायण चव्हाण, आरपीआय चे शहर अध्यक्ष वसंत कांबळे, शिक्षक परिषदेचे माध्यमिक जिल्हाध्यक्ष राजेंद्र यादव, मेजर अभिजीत जाधव सरकार, गड संवर्धनचे अध्यक्ष संदीप देसाई, ए बी देसाई, वंदना देसाई, शिवाजी देसाई, राजाराम देसाई, काशीनाथ देसाई,  भिमराव देसाई, विजय कांबळे, मिलिंद देसाई आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचलन  आश्विन व प्रजोती देसाई यांनी केले. सुधाकर देसाई यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment