![]() |
शिक्षक दिन कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवर. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगडमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन संपन्न झाला. प्रार॔भी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षण तज्ञ डाॅ जे. पी. नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रकल्प अधिकारी व जिल्हा समन्वयक प्रा संजय एन. पाटील यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाचे सुनियोजन केले.
प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील सर्वांना मार्गदर्शन करताना म्हणाले की ``गुरु हे अज्ञानाच्या अंधःकारात चाचपडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाचा नंदादीप तेवत ठेवतात. मायेचा ओलावा, वात्सल्याची ऊब ज्यांच्या ठायी मिळते ते गुरु. आपले मार्गदर्शक, प्रेरणास्थान, दिशादर्शक, उपदेशक हे आपले गुरुच असतात. गुरुंचा आदर व सन्मान करायला शिका व त्यानी दाखविलेल्या योग्य दिशेने वाटचाल करा अशी आशा व्यक्त केली. डाॅ. एस. डी. गोरल यांनी आभार मानले. यावेळी स्वयंसेवक, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय स्टाफ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment