महिलांनी संस्कारक्षम पिढी घडवावी - सौ . अनिता गावडे, लकीकट्टे येथे मंडळाच्या वतीने कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2021

महिलांनी संस्कारक्षम पिढी घडवावी - सौ . अनिता गावडे, लकीकट्टे येथे मंडळाच्या वतीने कार्यक्रम

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       विज्ञान तंत्रज्ञानाच्या  युगात व कारोणाच्या या संकटात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शाळा बंद राहिल्याने विद्यार्थींवर्गावार संस्कार करण्याची जबाबदारी पालकांवर येऊन पडली आहे. विशेषतः संस्कारक्षम पिढी घडवण्याची सर्वात मोठी जबाबदारी महिलांवरच असल्याचे प्रतिपादन गौळवाडी विद्या मंदिरच्या अध्यापिका सौ. अनिता गावडे यानी केले.

         संकल्प कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ लकिकट्टे (ता. चंदगड) यांच्या वतीने आयोजित हळदी- कुंकू कार्यक्रमामध्ये सौ. गावडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुमन कांबळे होत्या.

         सौ . अनिता गावडे पुढे बोलताना म्हणाल्या, ``शाळा बंद असल्याने संपूर्ण मूले मोबाईल व दुरदर्शनच्या विळख्यात सापडली आहेत. याचे अनेक दुष्परिणाम या मुलावर होत आहेत. शिक्षणापेक्षाही  सुसंस्कार होणे महत्वाचे असल्याने शिक्षणाव्यवस्थेबरोबरच महिलांनीही जागरूक राहून सुसंस्कार करण्याचे आवाहन सौ. गावडे यानी केले.

         यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नामदेव कांबळे, मनोहर कांबळे, सचिन कांबळे, दयानंद कांबळे, इराप्पा कांबळे, इश्वर गावडे आदि मान्यवर, महिला व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुमिता कांबळे  यानी केले तर आभार सौ.  श्वेता कांबळे यांनी मानले.





No comments:

Post a Comment