शिनोळी येथे शिवाजी विद्यापीठाच्या वतीने 'कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षण' कार्यक्रमाचे आयोजन - प्रा. डॉ. गुरव यांची माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2021

शिनोळी येथे शिवाजी विद्यापीठाच्या वतीने 'कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षण' कार्यक्रमाचे आयोजन - प्रा. डॉ. गुरव यांची माहीती

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या वतीने शिनोळी (ता. चंदगड) येथे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि लोकविकास केंद्र यांच्या अंतर्गत 'कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षण' आयोजित केल्याची माहीती शिवाजी विद्यापीठाचे प्रा. डॉ. ए. एम. गुरव यांनी दिली.

 या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांच्यामध्ये विविध कौशल्य विकसित करण्यासाठी कोर्सेसचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षणसाठी तीन महिन्यांचा कालावधी असून माफक फीमध्ये उच्चशिक्षक प्राध्यापक व विविध क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी शिनोळी येथील वसंत विद्यालय, सि.स.नं. ६०६, शिनोळी व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : ०२३१-२६०९४८५, २६०९१५१, महेश चव्हाण ७७४३८९२०८९, प्रशांत फगरे ८०८०६३२८३९, अतुल एतावडेकर ९६७३९६३३९९ यांच्याशी दुरध्वनी व भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने केले आहे. 

कोर्सेस खालीलप्रमाणे.......

• काजू प्रक्रिया उद्योग व विक्री, 

• बटाटा व रताळी प्रक्रिया उद्योग व विक्री

• टॅली

• ट्रॅव्हल्स् न्ड टुरिझम

• ड्रेस डिझायनिंग

या कोर्सेसचे नियोजन केले आहे. 

No comments:

Post a Comment