![]() |
प्रवीण देसाई यांचा सत्कार करताना परशराम कुंभार, शंकर पाटील, मधुकर चलवेटकर, डी. बी. पाटील आदी. |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
बेळगाव, विजयनगर, रक्षक कॉलनी येथील रहिवासी संघटनेतर्फे उचगाव फाटा, कल्लेहोळ क्रॉस येथील गणेश दूध संकलन केंद्राचे चेअरमन प्रवीण देसाई यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. गणेश दूध संकलन केंद्रातर्फे बेळगाव, चंदगड, खानापूर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचे काम सुरू आहे. याची दखल घेत प्रवीण देसाई यांना चिकोडी येथे माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्या हस्ते राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल रक्षक कॉलनी रहिवासी संघटनेचे अध्यक्ष व निवृत्त कॅप्टन बी. एल. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेच्या उपाध्यक्ष रेणुका भातकांडे, सेक्रेटरी व ग्रामपंचायत सदस्य डी. बी. पाटील, प्रकाश पाटील, पी. आर. रेडेकर, अशोक घाटगे, मारुती जाधव, परशराम कुंभार, शंकर पाटील, मधुकर चलवेटकर उपस्थित होते. बी. एल. पाटील, म्हणाले गणेश दूध संकलन केंद्राने पूरग्रस्तांना मदत, गरजूंना क्रीडा साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना दूध वाटप, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन मेळावे, भरवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. डी. बी. पाटील यांनीही गणेश दूध संकलनाच्या प्रगतीबाबत कौतुक केले.
यावेळी प्रवीण देसाई म्हणाले, ``मी गणेश दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून केवळ व्यवसाय म्हणून न पाहता या केंद्राच्या माध्यमातून चंदगड व खालापूर तालुक्यात पूरग्रस्तांना मदत वाटप केले आहे. दुग्ध पदार्थ तयार करून जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शैक्षणिक व क्रीडा साहित्य वाटप केले आहे. सामाजिक उपक्रम राबवले आहेत. या पुढील काळातही समाजातील गरजू लोकांसाठी मदत करणे, या उपक्रमाला आमचे प्राधान्य राहील.`` यावेळी दूध संकलन केंद्राचे व्यवस्थापक सुधाकर करटे, मोतिराम देसाई, संचालक किरण देसाई, बळवंत झेंडे, सुनील शिंदे, अरुण हरेर, सुरज करडे, सचिन पावशे, महेश होसूरकर, शंकर पाटील, परशुराम कुंभार यांच्यासह चंदगड तालुक्यातील रहिवासीही उपस्थित होते. सुत्रसंचालन तनुजा गावडा यांनी केले तर आभार सुष्मा पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment