![]() |
बेळगाव : कार्यक्रमाला उपस्थित कलाश्री ग्रुपचे संचालक प्रभाकर कुंडेकर, एमडी प्रकाश डोळेकर अरविंद खडबडी, किरण जाधव, अनंत नाडगौडा, रवींद्र थोरात, सतीश नाईक आदी |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
उद्यमबाग, बेळगाव येथील कलाश्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजतर्फे आयोजित चौदाव्या सोडतीमध्ये लकी ड्रॉ मधून खानापूर तालुक्यातील लोकोळी गावातील पूर्वी पाटील व नागेश पाटील या दापंत्याला थायलंड- मलेशिया विदेश दोऱ्याचे तिकीट बक्षीस लागले. सोमवारी दि. २० रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बेळगाव, उद्यमबाग, खानापूर रोड येथील कलाश्री टॉवर मध्ये सोडत कार्यक्रम झाला.
या सोडतीमध्ये कुसमळी येथील प्रवीण देसाई, हिंडलगा येथील मनोर पाटील, बस्तवाड येथील सुशांत बांडगी, हंगरगा येथील मल्लाप्पा पार्लेकर, गुंजेनहट्टी येथील आदित्य पाटील, वाघवडे येथील आदिती मोनाप्पा पाटील या सात सभासदांना उच्च प्रतीचे सुटकेस उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून देण्यात आले.
कार्यक्रमाला भाजपचे नेते व कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सेलचे सेक्रेटरी किरण जाधव, ई क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष अनंत नाडगौडा, रोटरी क्लब ऑफ सेंट्रल बेळगावचे अध्यक्ष रवींद्र थोरात, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष अरविंद खडबडी, रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचे सदस्य सतीश नाईक, लेखक व ज्योतिर्लिंग मल्टीपर्पज सोसायटी, हिंडलगा चे चेअरमन दिलीप सोहानी, कलाश्री ग्रुपचे संचालक प्रकाश डोळेकर यांच्यासह या योजनेचे डीलर्स, सभासद व कलाश्रीचे व्यवस्थापक, कर्मचारी उपस्थित होते.
आगामी 15 व्या सोडत सोडत योजनेमध्ये सहभागी झालेल्या बेळगाव, आजरा, चंदगड तालुक्यातील सदस्यानी भेटवस्तू घेऊन जाण्याचे आवाहन प्रकाश डोळेकर यांनी यावेळी केले.
No comments:
Post a Comment