बोंजूर्डी येथे ५ .५३ लाखांचा अवैध्य दारू साठा जप्त, उत्पादन शुल्कची कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

07 September 2021

बोंजूर्डी येथे ५ .५३ लाखांचा अवैध्य दारू साठा जप्त, उत्पादन शुल्कची कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करुन बोजुर्डी येथे साडेपाच लाखांचा अवैध दारुसाठी जप्त केला.


अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

            अडकूर पासून जवळच असलेल्या बोंजूर्डी ( ता. चंदगड ) येथे अवैद्य गोवा बनावट विदेशी मद्याच्या साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून वेगवेगळया ब्रॅण्डचे एकूण 52 बॉक्स जप्त केले. ही कारवाई आज (मंगळवार दि. 07 सप्टेंबर रोजी)  बोंजुडी (ता. चंदगड) या गावच्या हद्दीतील चिरका नावाच्या शेतवडीत करण्यात आली. यामध्ये एकूण 5 लाख 53 हजार 440 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी प्रविण सुरेश नाईक (वय 28), सुरेश ईश्वर नाईक (वय 54, दोघेही रा.बोंजुर्डी, ता.चंदगड, जि. कोल्हापूर) या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदगड तालुक्यातील बोंजुर्डी गावच्या हद्दीतील चिरका नावाच्या शेतवडीत छापा टाकून गोवा राज्यातून आणलेला गोवा बनावटीचा विदेश दारु साठा जप्त केला आहे. हा साठा आणण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनासह दारुचे एकूण 52 बॉक्स जप्त करण्यात आले असून सदर ठिकाणी मिळून आलेल्या मुद्देमालाची किंमत 5 लाख 53 हजार 440 रुपये इतकी आहे.

              सदर कारवाई वाय. एम. पोवार (उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर) तसेच रविंद्र आवळे (अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गडहिंग्लज विभागाने केली. यामध्ये संयुक्तपणे निरीक्षक एम. एस. गरुड, दुय्यम निरीक्षक गडहिंग्लज, जी. एन.गुरव, दुय्यम निरीक्षक, रा.उ. चंदगड, ए. बी. वाघमारे, सहा. दु. निरी एस. आर. ठोंबरे व  एन. एस. केरकर व जवान ए. आर. जाधव, संदीप चौगुले यांनी सहभाग घेतला. सदर गुन्हयाचा पुढील तपास एम. एस. गरुड, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडहिंग्लज हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment