कुदनुर येथील लक्ष्मी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत - चंदगड लाईव्ह न्युज

07 September 2021

कुदनुर येथील लक्ष्मी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

कुदनुर येथील लक्ष्मी पतसंस्थेची वार्षिक सभेवेळी उपस्थित मान्यवर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

              कुदनूर, ता. चंदगड येथील श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा  खेळीमेळीत पार पडली.  सन २०२०-२१ च्या ऑनलाईन सभेच्या  अध्यक्षस्थानी चेअरमन एल एस कोले होते.  प्रास्ताविक सचिव एम एम जमादार यांनी केले. अहवाल वाचन व्यवस्थापक बाळकृष्ण नागरदळेकर यांनी केले. संस्थेला अहवाल सालात १३ लाख ४४ हजार नफा झाला असून सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेची वार्षिक उलाढाल १० कोटी ६८ लाख असून खेळते भांडवल ५ कोटी ८८ लाख इतके आहे. काटकसरीच्या कारभारामुळे सभासदांना दरवर्षी अधिकाधिक लाभांश देण्यात संस्था यशस्वी ठरली आहे.

            यावेळी डॉ सुहास धबाले, एस आर गुंडकल, कृष्णा मांडेकर, अशोक नागरदळेकर, पी बी पाटील, रामचंद्र बामणे, दत्तू कृष्णा पवार, प्रा भरमु नौकुडकर, प्रा कृष्णा बामणे, जानबा मल्हारी, रमेश कारेकर, दयानंद रेडेकर, मोहन नुलेकर, विनायक आंबेवाडकर, शिवाजी आंबेवाडकर, प्रकाश हेब्बाळकर, बाळगौडा पाटील, रमेश हंपनावर, ईश्वर गवंडी, रणजीत कोले, केदारी कोले, जीवबा जाधव, बी के पाटील, अशोक आंबेवाडकर, उदय जाधव, उत्तम मुतकेकर आदी सभासद ऑनलाईन तसेच सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते. चंद्रकांत निर्मळकर यांनी आभार मानले

No comments:

Post a Comment