आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त शितल पाटील यांचा शिनोळी खुर्द ग्रामपंचायततर्फे सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2021

आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त शितल पाटील यांचा शिनोळी खुर्द ग्रामपंचायततर्फे सत्कार

शिनोळी खुर्द : शीतल पाटील व डॉ. सुनील पाटील या दांपत्याच्या सत्कार करताना सरपंच परशराम पाटील. शेजारी जि. प. सदस्य अरुण सुतार, एस. वाय. पाटील, पुनम खांडेकर, उमेश पाटील आदी.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

       शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मुरकुटेवाडी (ता. चंदगड) येथील प्राथमिक विद्यामंदिरच्या शिक्षिका शितल सुनील पाटील (रा. शिनोळी)  यांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल  सत्कार करण्यात आला. सरपंच परशराम पाटील, उपसरपंच पुनम खांडेकर,  जिल्हा परिषद सदस्य अरुण सुतार, चंदगड तालुका संघाचे मॅनेजर एस. वाय. पाटील,डॉ. सुनील पाटील यांची प्रमुख  आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त शितल पाटील यांचा शिनोळी खुर्द ग्रामपंचायततर्फे सत्कारउपस्थिती होती.

शितल पाटील यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबविल्याबद्दल जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्याकडून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्कार दिला आहे. शितल पाटील या शिनोळी खुर्द येथील रहिवासी तर मुरकुटेवाडी येथील प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत.

कार्यक्रमाप्रसंगी ग्रामसेवक विनय संभाजी, ग्रामपंचायत सदस्य तानाजी खांडेकर, वंदना पाटील, कांचन मंनोळकर, रेखा तरवाळ, उमेश पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.



No comments:

Post a Comment