![]() |
मंदार श्रीकांत मांद्रेकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
घरातील लोकांच्यासोबत झालेल्या घरगुती भांडणाच्या रागातून मंदार श्रीकांत मांद्रेकर (वय-22, रा. ब्राम्हण गल्ली, चंदगड) हा युवक घरातून निघून गेला आहे. १४ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी अडीज वाजल्यापासून तो बेपत्ता आहे. याबाबतची वर्दी श्रीकांत वामन मांद्रेकर यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे.
यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी – मंदार याचे घरातील लोकांच्यासोबत घरगुती भांडण झाल्याने तो घरातील कोणालाही काहीही न सांगता कोठेतरी निघून गेला आहे. घरच्या मंडळींनी पै-पाहुणे, मित्र यांचेकडे शोध घेवुनही तो आजपर्यंत सापडला नाही. त्यामुळे घरच्यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसात दिली आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे - अंगाने- जाड, रंगाने गोरा, अंगात- निळया रंगाचा चौकडा शर्ट, जिन्स पॅन्ट, पायात सँन्डल, भाषा मराठी, हिंदी बोलतो. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे. वरील वर्णनाचा बेपत्ता झालेला युवकांविषयी माहीती मिळाल्यास चंदगड पोलीस ठाणेशी दुरध्वनी क्रमांक ०२३२०-२२४१३३ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment