मोदगे येथील कबड्डी स्पर्धेत कालकुंद्री संघ विजेता, बसुर्ते संघाला चतुर्थ क्रमांक - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2021

मोदगे येथील कबड्डी स्पर्धेत कालकुंद्री संघ विजेता, बसुर्ते संघाला चतुर्थ क्रमांक

मोदगे : पुंडलिक पाटील व विजेत्या कालकुंद्री संघाचे खेळाडू.


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

        मोदगे (ता. हुक्केरी)  येथील श्री भावेश्वरी कबड्डी संघाने आयोजित केलेल्या 58 किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेत कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री कल्मेश्वर स्पोर्ट्स क्लब  संघाने  सांगेली (सावंतवाडी) येथील कबड्डी संघाला पाच गुणांनी पराभूत करत प्रथम क्रमांक पटकावला.

         या स्पर्धेचे उद्घाटन सलामवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष शरद पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पिंटू वडर, अनंत शिंत्रे, विलास कोकितकर, राणबा पाटील, गजानन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

         या स्पर्धेत तृतीय क्रमांक शेट्टीहळ्ळी संघाने पटकावला. तसेच चतुर्थ क्रमांक बसुर्ते (ता. चंदगड) संघाने पटकावला. शिस्तबद्ध संघ म्हणून मोदगे संघाची  निवड करण्यात आली.

          कालकुंद्री संघाचा रायडर शुभम पाटील याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच फायनल सामन्यामध्ये उत्कृष्ट रायडर म्हणून कालकुंद्री संघाच्या सुमित पाटील या खेळाडूची निवड झाली. कालकुंद्री संघामधून गौतम कांबळे, राजू खवणेवाडकर, अभिजित पाटील, आदेश जोशी, अजिंक्य तेऊरवाडकर या खेळाडूंनी मोलाची साथ देत विजय मिळवून दिला.  या संघाला गजानन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment