चंदगड येथील डॉ .बाबासाहेब आंबेडकर नगर येथे ओपन जिमचे उद्घाटन, नगरसेविका नेत्रदीपा कांबळे यांचा पुढाकार - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2021

चंदगड येथील डॉ .बाबासाहेब आंबेडकर नगर येथे ओपन जिमचे उद्घाटन, नगरसेविका नेत्रदीपा कांबळे यांचा पुढाकार

डॉ .बाबासाहेब आंबेडकर नगर चंदगड येथे ओपन जिमचे उद्घाटन करताना नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, शेजारी नगरसेविका नेत्रदीपा कांबळे, इतर नगरसेवक व नगरसेविका.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड येथील प्रभाग क्रमांक ७ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना २०२१ अंतर्गत नगरसेविका नेत्रदीपा कांबळे यांनी ओपन जिमचे साहित्य आणून ओपन जिम लोकार्पण कार्यक्रम केला. ओपन जीमचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. प्राची दयानंद काणेकर यांच्या हस्ते झाले.

       सिक्सपॅक शरीरयष्टी असावी, असे तरुणांना नेहमीच वाटते. त्यासाठी व्यायामशाळेत (जीम) जाऊन भरपूर व्यायाम करणे. तेथील प्रशिक्षकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार घेण्यावर तरुणाई भर देताना दिसते. दुसरीकडे शारीरिक फिटनेससाठी मध्यमवयीन, वृद्ध व शालेय मुलेही छोट्या-मोठ्या व्यायामात रमतात. मात्र, प्रत्येकालाच जीममध्ये जाऊन त्याची व प्रशिक्षकांची फी भरणे शक्य नसते. त्यामुळेच आता नगरमध्ये हळूहळू खुल्या व्यायामशाळांचा अर्थात 'ओपन जीम'चा ट्रेंड निर्माण होऊ लागला असून, त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना खुल्या वातावरणात व्यायाम करण्याचा आनंद अबालवृद्ध यातून घेत आहेत. 

        या गोष्टी लक्षात घेवून नगरसेविका नेत्रदिपा कांबळे यांनी ओपन जीमची सुरवात केली. कार्यक्रमाला मुख्याधिकारी अभिजित जगताप  प्रमुख उपस्थिती होते. यासह पंचायत समिती सदस्य दयानंद काणेकर, माजी जि. प. सदस्य राजेंद्र परीट, संजय गांधी निराधार तालुकाध्यक्ष प्रवीण वाटंगी, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, नगरसेविका सौ. अनिता परीट, सौ. संजीवनी चंदगडकर, मारुती कुंभार, सौ अनुसया दानी, सौ. संजना कोकरे,  नगरसेवक सचिन नेसरीकर, अभिजीत गुरबे, मेहताब नाईक, बाळासाहेब हळदणकर, रोहित वाटंगी, झाकीर नाईक, करीम मदार, आंबेडकर युवा फाउंडेशनचे कार्यकर्ते दिनेश कांबळे, कुणाल कांबळे, रब्बानी मदार, राहुल धुपदाळे, स्टीफन धुपदाळे, अभिजीत कार्वेकर, प्रतीक नांगरे उपस्थित होते. आभार प्रमोद विनायक कांबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment