कालकुंद्री ताम्रपर्णी नदी घाटावर गौरी गणपती विसर्जनासाठी झालेली गर्दी.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील येथे ताम्रपर्णी नदी घाटावर भक्तिमय वातावरणात गौरी-गणपती विसर्जन करण्यात आले. गणेश भक्तांचा उत्साह यावेळी शिगेला पोहोचला होता.
गेल्या काही वर्षापासून ग्रामपंचायत कालकुंद्री मार्फत नदी घाटावर निर्माल्य संकलन उपक्रम राबवला जात आहे. त्याला यावर्षी सुद्धा भाविकांचा शंभर टक्के प्रतिसाद लाभला. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कर्मचारी सागर पाटील, उदय सुतार, नरसु कांबळे यांनी परिश्रम घेतले. तथापि या वेळी सुरू असलेली फटाक्यांची आतषबाजी हवा प्रदूषणाला निमंत्रण देत होती.
![]() |
कालकुंद्री ग्रामपंचायतीच्या वतीने निर्माल्य टाकण्यासाठी ठेवलेला संकलन रथ. (सर्व छायाचित्र - श्रीकांत पाटील, कालकुंद्री) |
परिसरातील कागणी, कुदनूर, राजगोळी, किटवाड, कोवाड, आदी कर्यात भागातील सर्व गावांत भक्तिमय वातावरणात शांततेने गौरी गणपती विसर्जन पार पडले. बहुतांश गावांत अद्यापही निर्माल्य नदी- ओढ्यात टाकले जात होते. संबंधित ग्रामपंचायतींनी कालकुंद्री येथील उपक्रमाचे अनुकरण करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment