सुनील सोनटक्के कोल्हापूर जिल्ह्याचे नवे माहिती अधिकारी - चंदगड लाईव्ह न्युज

14 September 2021

सुनील सोनटक्के कोल्हापूर जिल्ह्याचे नवे माहिती अधिकारी

 


कोल्हापूर : सी. एल. वृत्तसेवा

 कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन माहिती अधिकारी म्हणून सुनील सोनटक्के रुजू झाले. सहायक संचालक (माहिती) फारुख बागवान यांच्याकडून सुनील सोनटक्के यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.

   यावेळी माहिती अधिकारी वृषाली पाटील, माहिती सहायक एकनाथ पवार, सचिन वाघ, रोहित माने, सतीश कोरे, अनिल यमकर, दामू दाते, स्वप्नाली कुंभार आदींची उपस्थिती होती.

     मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील बेंबळी गावचे असणाऱ्या सुनील सोनटक्के यांनी आजवर जळगाव येथे माहिती अधिकारी म्हणून तर हिंगोली, सोलापूर व लातूर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्य केले आहे. लातूर विभागाचे प्रभारी उपसंचालक म्हणून त्यांनी १० महिने, याशिवाय बीड, उस्मानाबाद येथे प्रत्येकी एक वर्ष तर नांदेड येथेही अतिरिक्त जिल्हा माहिती अधिकारी म्हणून यशस्वीपणे कार्यभार पार पाडला आहे.


No comments:

Post a Comment