मनसे संलग्न मराठी कामगार सेनेच्या महाराष्ट्र सरचिटणीसपदी प्रशांत अनगुडे यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

27 September 2021

मनसे संलग्न मराठी कामगार सेनेच्या महाराष्ट्र सरचिटणीसपदी प्रशांत अनगुडे यांची निवड

प्रशांत शिवाजी अनगुडे


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           महाराष्ट्र नवनिर्माण सेना सलग्न मराठी कामगार सेनेच्या महाराष्ट्र सरचिटणीस पदी प्रशांत शिवाजी अनगुडे (रा. खा. कोळींद्रे ता.चंदगड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कामगार सेना अध्यक्ष महेश पाटील यांनी श्री. अनगूडे याना निवडीचे पत्र दिले. 

         मराठी कामगारांना खंबीर नेतृत्वाची गरज असून त्याची विश्वासाहर्ता जपणे सर्वात महत्वाची जबाबदारी आहे. मराठी कामगार सेनाच्या पुढील कार्यात मराठी कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढण्याची तत्परता दाखवून अभ्यासपूर्ण सक्रीय राहावे ही अपेक्षा मराठी कामगार सेनेकडुन आपल्या कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ही नियुक्ती एका वर्षासाठी आहे.महाराष्ट्र सरचिटणीस पदाचा कार्य अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढी संदर्भात निर्णय घेतला जाईल.

No comments:

Post a Comment