रेशमी शेत प्रकल्प अभ्यासासाठी भोगण यांची निवड, कृषी महाविद्यालयात संबंधितांना मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

03 September 2021

रेशमी शेत प्रकल्प अभ्यासासाठी भोगण यांची निवड, कृषी महाविद्यालयात संबंधितांना मार्गदर्शन

रेशमी शेत प्रकल्प अभ्यासासाठी निवड झालेले भोगण.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्नित महाविद्यालयांचे कृषिदूत विशाल कांबळे, सूरज नाईक, आफताब मुल्ला व संतोष डिसुझा यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२२ या अंतर्गत मांडेदुर्ग येथील रेशीम व नाचणी शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विजय मारुती भोगण यांची हैद्राबाद येथील प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. रेशीम किड्यापासून उत्पादन व नाचणी शेती ची माहिती त्यांनी नुकताच राहुरी कृषी महाविद्यालय अंतर्गत महाविद्यालयीन संंबंधित चौघांना दिली.

             विजय भोगण हे पेशाने वकील असून पहिल्यापासून त्यांना शेतीमध्ये खूप आवड होती आणि आजही आहे. २०१५ साली १ एकरामध्ये रेशीम शेती प्रकल्पाची नोंदणी केली. यावेळी येणाऱ्या अडचणींना न डगमगता ते खंबीरपणे सामोरे गेले. रेशीम किड्यापासून उत्पादन घेणे व बाजारात त्याची विक्री करणे या दरम्यान अडचणी आल्या पण सर्व अडचणींवर मात करत आज ते रेशीम शेती क्षेत्रात तालुक्यात अग्रेसर आहेत. या पासून मिळणारे उत्पादन ते बंगलोर ला विक्री करत असत पण मांडेदुर्ग ते बंगलोर अंतर जास्त असल्यामुळे उत्पादनाचा दर्जा कमी होत होता.त्यासाठी अथक प्रयत्न करून जयसिंगपूर येथे रेशीम खरेदी विक्री केंद्र मंजूर करून घेतले. नुकतेच त्यांची हैदराबाद येथे होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. तसेच ते नाचणी शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्षपदी रुजू झाले आहेत. तसेच इतर शेतकऱ्यांसाठी ते प्रगतशील शेतकरी होण्यासाठी धडपडत आहेत.

        त्यांनी त्यांच्या शेतीची माहिती देताना असा संदेश दिला की शेतीकडे एक संधी म्हणून पाहा आणि स्वतः व्यवसाय सुरू करून एक नवीन ओळख बनवा. ही सर्व माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्नित महाविद्यालयांचे कृषिदूत विशाल कांबळे (कृषि महविद्यालय बारामती), सूरज नाईक (कृषि महाविद्यालय कडेगाव), आफताब मुल्ला आणि संतोष डिसूझा (कृषि महाविद्यालय कोल्हापूर) यांनी घेतली.




No comments:

Post a Comment