हलकर्णी येथे अथर्व संचलित दौलत साखर कारखाना बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम, अग्निप्रदिपनचा मान उत्पादक शेतकरी दांम्प्त्याला - चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2021

हलकर्णी येथे अथर्व संचलित दौलत साखर कारखाना बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम, अग्निप्रदिपनचा मान उत्पादक शेतकरी दांम्प्त्याला

 

हलकर्णी ता.चंदगड येथील अथर्व-दौलत साखर कारखाना बॉयलर अग्निप्रदिपन करताना  केदारी जोतिबा सांवत व त्यांच्या सुविद्य पत्नी व सोबत अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे व इतर मान्यवर.

चंदगड / प्रतिनिधी 

      हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरटेड प्रा. लि.संचलित दौलत साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन हलकर्णी गावचे ऊस उत्पादक शेतकरी  केदारी जोतिबा सावंत व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

      अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. या कंपनीने दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना दिर्घ काळासाठी भाडेतत्वावर चालविणेस घेतलेला आहे. सन २०१९-२० व २०२०२१ या दोन वर्षामध्ये कारखान्याने यशस्विरित्या गाळप हंगाम पुर्ण केले आहेत. हा कारखाना चालविणेस घेतलेल्या या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मानसिंग खोराटे यांच्या कुशल नेतृत्वाखाली कारखान्याचे कामकाज व वाटचाल चालू आहे. आमच्या कंपनीने कारखाना चालविणेस घेतले पासून यापूर्वी झालेल्या दोन हंगामातील ऊस बिले शेतकऱ्यांना तसेच तोडणी वाहतुक कंत्राटदारांची बिले वेळेत अदा करुन कंपनी व्यवस्थापनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. 

       या कालावधीत शेतकऱ्यांना शेती विभागामार्फत ऊसपिक वाढ व संवर्धन या करीता मार्गदर्शनपर परिसंवाद घेतलेले आहेत. तसेच अल्प दरामध्ये चांगल्या प्रतिचे कंपोष्ट खतेही वाटप केलेले आहे. तसेच वेगवेगळ्या विकासाच्या  योजनाही राबविणेत येत आहेत. यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस पुरवठदार शेतकरी पुर्णपणे समाधानी आहेत. तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील बेरोजगाराची व ऊस पुरवठादार यांची ऊस बिलाची अनिश्चितता संपली आहे. सन २०२१-२२ गळीत हंगाम सुरु करण्यासाठी कारखान्याने सर्व तांत्रिक चाचण्या घेतल्या असून, कारखाना गळीतासाठी तयार आहे. ऊस तोडणी वाहतुक करारातील यंत्रणा कारखाना कार्यस्थळावर व परिसरात दाखल होत आहेत. भौगोलीक पर्जनमान परिस्थितीचा  १७ ऑक्टोंबर २०२१ पासून गाळप हंगाम सुरु होणार आहे. यावर्षी ६लाख मे. टन इतके गाळप होणार असून, प्रथम प्राधान्याचे भागातील ऊसाची तोड होऊस ऊस गाळपास आणला जाणार आहे. यापूर्वी प्रमाणे येणाऱ्या ऊसाची बिलेही वेळेत अदा होणार आहेत. कारखान्याने यावर्षी कांही मशिनरीचे आधुनिकीकरण केले आहे. त्यामुळे गाळप क्षमता वाढून उत्पादन खर्च कमी होणेस मदत होईल. कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवानी आतापर्यत चांगल्या प्रतिचा ऊस पुरवठा करुन सहकार्य केले आहेच, तसेच यापूढेही असेच सहकार्य राहील अशी अपेक्षा कंपनीचे अध्यक्ष श्री खोराटे यांनी सदर कार्यक्रमप्रंसगी भावना व्यक्त केल्या. प्रतिकुल परिस्थितीत व आर्थिक अडचणीतून मार्ग काढून कारखाना उत्तमरित्या चालविणे व गाळप हंगाम यशस्विरित्या पार पाडणेस कंपनी कटिबध्द आहे.

           या कारखान्याचे सर्व कर्मचारी बंधुनी चांगले काम करून योगदान दिले आहे. असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. केंद्र शासनाचे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे नविन धोरणानुसार कारखाना कार्यस्थळावर स्वतंत्र नविन इथेनॉल प्रकल्प उभा केला असून, त्याच्या यशस्विरित्या चाचण्या घेतल्या आहेत. सदरचा प्रकल्प नजीकच्या काळात कार्यान्वीत होईल. बाजारपेठेत इथेनॉलला चांगली मागणी आहे. त्यामुळे कारखान्यास आर्थिक लाभ होईल साहजिकच त्याचा भविष्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाला जादा दर देणे सोईचे होईल, पुढील काळातील कारखान्याकडे इतर काही नविन प्रकल्प उभा करुन नविन रोजगार व आर्थिकस्थिरता देणेच्या दृष्टीने अथर्व चे व्यवस्थापन विचार करत असलेचे त्यांनी सांगितले.

           याप्रंसगी कंपनीचे संचालक पृथ्वीराज खोराटे, विजय पाटील, युनिट हेड  धनंजय जगताप, सेक्रेटरी अनिल काटे, मनोहर होसुरकर, फायनान्स मॅनेजर बाळासाहेब कदम, ओएसडी अजित कुलकर्णी, डे. चिफ इंजिनिअर श्री पाटील, प्रोसेस हेड, श्री पाटील, डिस्टीलरी मॅनेजर श्री माने, मुख्य शेति अधिकारी श्री गदळे, बॉयलर इंजिनिअर  स्वरुप पाटील या अधिकारी तसेच कारखान्याचे माजी संचालक शिवाजी सखोबा सावंत, वसंत निकम, अशोक रामा पाटील,  पुंडलिक नरसोबा पाटील, शिवाजी हसबे,  गोविंद पाटील, विलास पाटील तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment