मोरेवाडी येथील ह.भ.प. कृष्णा कुराडे यांच्या अर्धमतीच्या मिरवणूकीत सहभागी झालेले भक्तगण. |
तेऊरवाडी (एस. के. पाटील)
मोरेवाडी (ता. चंदगड) येथे ह. भ. प. वै. कृष्णा कुराडे यांच्या प्रथम पुण्यतिथी सोहळ्यानिमित्य स्मारक वास्तूशांती, मुर्ती अभिषेक व सत्यनारायण महापुजेचे आयोजन रविवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोरेवाडीत पंढरपूरची दिंडी अवतरली तर भक्तीमय वातावरणात संपन्न झाली स्मारक वास्तूशांती, मूर्ती अभिषेक व रक्तदान शिबीरही कोरोणानंतर अडकूर परिसराने अनुभवला भक्तिरस.
नियोजनानुसार विठ्ठल रखुमाई मंदिरात सत्यनाराण महापूजा संपन्न झाली. त्यानंतर लगेच सजवलेल्या गाडीतून कै. कृष्णा कुराडे यांच्या अर्धपुतळा मुर्तींची टाळ मृदूंगाच्या तालावर दिंडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सकाळी १० नंतर शिवकुमार स्वामी यांच्या मंत्रोच्चारात होम, मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व अभिषेक करण्यात आला.नंतर ध्वजपूजन, तुळस पुजन, गाथा पूजन व दिपप्रज्वलन होऊन दुपारी १ नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारी सांप्रदायिक दिंडयाचे भजन तर सायंकाळी हरिपाठ तुकाराम वाईगडे (कुमरी) यांचे प्रवचन व रात्री अरुण पोवार (तळाशी, राधानगरी) यांचे किर्तन झाले. याबरोबरच दुपारी अनिल कुराडे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रमही झाला. या भक्तिमय कार्यक्रमाचा लाभ अडकूर, बोंजूर्डी, विंझणे, ऊत्साळी, चाफवडे, भावेवाडी आदि २५ हून अधिक दिंडया यामध्ये सहभागी होऊन घेतला.
अंगामध्ये पांढरा शुभ्र वेश, डोकीवर पांढरी टोपी, हातात टाळ, मुखात हरिनामाचा जयघोष, खांद्यावर भगवी पताका , महिलांच्या डोकीवर पवित्र कलश,मध्येच माऊलीचा जयघोष करत, फुगडी रंगल्याने पंढरपूरच्या वारीचा भास मोरेवाडीत निर्माण झाला होता. यानिमित्य संपूर्ण मोरेवाडी गाव रांगोळी टाकून व भगव्या पताका लावून सजवण्यात आले होते. या वेळी कार्यक्रम स्थळी रक्तदानाचा कार्यक्रम अण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँक गडहिंग्लज यांचेकडून घेण्यात आला. यामध्ये ३१ रक्तदात्यानी आपले पवित्र रक्तदान केले. यावेळी या कार्यक्रमाचे आयोजक लक्ष्मण कुराडे, सौ. चंद्रभागा कुराडे व कुटुंबिय मोरेवाडी स्मारक समिती, सखाराम पाटील, इरापा कुराडे, भिमराव पाटील आदी मान्यवर व भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्ती तिबिले यानी केले. तर सर्व भाविक भक्तांचे आभार लक्ष्मण कुराडे यानी मानले.
No comments:
Post a Comment