बळीराजा नवरात्र महोत्सवातर्फे गुरुवार पासून 'फेसबुक लाईव्ह'द्वारे व्याख्यानमाला, बळीराजा काजू दर संघर्ष समितीतर्फे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

06 October 2021

बळीराजा नवरात्र महोत्सवातर्फे गुरुवार पासून 'फेसबुक लाईव्ह'द्वारे व्याख्यानमाला, बळीराजा काजू दर संघर्ष समितीतर्फे आयोजन



कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

       बळीराजा काजू दर  संघर्ष  समितीतर्फे बळीराजा नवरात्र महोत्सवअंतर्गत गुरुवार दि. 7 पासून चार दिवस फेसबुक लाईव्हद्वारे व्याख्यानमाला होणार आहे. याबाबतची माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते नितीन पाटील (चंदगड) व विलास बेळगावकर (खानापूर) यांनी दिली.

          यंदाच्या नवरात्र महोत्सवाची ‘जागर स्त्रि आरोग्याचा, जागर करियरचा, ही टॅगलाईन असून व्याख्यानमालेत देशातील विविध ठिकाणाहून चार मान्यवर सहभाग होणार आहेत. गुरुवार दि.  7  रोजी नागणवाडी (ता. चंदगड)  येथील रहिवासी व सध्या रायपूर ( छत्तीसगड) येथे सहाय्यक पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत असलेले किरण चव्हाण हे ‘स्पर्धा परीक्षा  : नव्या संधी’ या विषयावर संध्याकाळी 7 वा. दुसरे व्याख्यान शनिवारी दि.  9 रोजी हवाई दलाचे निवृत्त कर्मचारी व आंतरराष्ट्रीय धावपटू  प्रशांत पाटील ‘पोलीस व सैन्य भरती’ या विषयावर, सोमवार दि. 11 रोजी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या  वैद्यकीय अधिकारी व आहारतज्ञ श्रुती भोला या 'समतोल आहार आणि उत्तम आरोग्य ' यावर संध्याकाळी 7 वा. मार्गदर्शन करतील. 

         दि. 12 रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुष्मा बसवंत यांचे ‘वयात येताना’ या विषयावर सायं. 7 वा. व्याख्यान होणार आहे. बेळगाव, खानापूर, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी भुदरगड या कार्यक्षेत्रातील  सर्व सदस्यांनी, नागरिकांनी, त्यांच्या पाल्यांनी या फेसबुक लाईव्हद्वारे आयोजित  व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नरेंद्र पाटील, विद्यानंद  गावडे यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment