देश सेवा बजावणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी ठाम राहणे हा माझा राजधर्म --- समरजितसिंह घाटगे, राजे फौंडेशनकडून उभारलेल्या शहीद वीरजवान साताप्पा पाटील यांच्या स्मारकाचे लोकार्पण - चंदगड लाईव्ह न्युज

22 October 2021

देश सेवा बजावणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी ठाम राहणे हा माझा राजधर्म --- समरजितसिंह घाटगे, राजे फौंडेशनकडून उभारलेल्या शहीद वीरजवान साताप्पा पाटील यांच्या स्मारकाचे लोकार्पण

मासा बेलेवाडी ता कागल येथील शहीद वीर जवान साताप्पा पाटील यांच्या समाधीस्थळाला पुष्पचक्र अर्पण करताना शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे 

चंदगड/प्रतिनिधी :-- (नंदकुमार ढेरे)
 देश सेवा बजावणाऱ्या आजी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे. हा माझा राजधर्म आहे.असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
मासा बेलेवाडी ता कागल येथील शहीद वीर जवान साताप्पा पाटील यांच्या समाधीस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यात मार्गदर्शन करताना राजे समरजितसिंह घाटगे,बसलेले वीरपिता महादेव पाटील, वीरपत्नी अश्विनी पाटील,सरपंच आनंदराव पाटील,सेवानिवृत्त कर्नल शिवाजीराव बाबर.

   आठ वर्षापूर्वी शहीद झालेल्या मासा बालेवाडी येथील वीर जवान साताप्पा पाटील यांच्या स्मारकस्थळ परिसराची दुरावस्था झाली होती. याबाबतची माहिती श्री. घाटगे यांना सैनिक,तरुण व  ग्रामस्थांनी दिली होती. त्यासाठी राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशन व शाहू ग्रूपच्या पुढाकारातून  या परिसराची स्वच्छता व सुशोभीकरण करून समाधीस्थळ पूर्ण केले.त्याचा लोकार्पण सोहळा श्री. घाटगे यांच्यासह शहीद वीर जवान यांचे कुटुंबीय, आजी माजी सैनिक व ग्रामस्थांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.
घाटगे यांच्यासह वीरपिता महादेव पाटील, वीरमाता आनंदी पाटील, वीरपत्नी अश्विनी पाटील,सरपंच आनंदराव पाटील, कर्नल निवृत्त शिवाजीराव बाबर, लक्ष्मण हांडे, बी जी पाटील, आनंदा पाटील एकनाथ गोरुले यांनी स्मारक स्थळी पुष्पचक्र अर्पण केले.
    ते पुढे म्हणाले, सैनिकांचा त्याग व पराक्रमाचे समाज नेहमीच स्मरण करीत असतो.आजी माजी सैनिक व शाहू ग्रुपचे ऋणानुबंध आहेत. सैनिकी परंपरेचे बाळकडू मला जन्मजातच मिळाले आहे.सैनिकी शिस्तीमुळेच शिस्तबद्ध व्यवस्थापनासाठी शाहू ग्रूप देशभरात नावाजला जातो.तो सैनिकी अधिकार्‍यांनी शाहू ग्रूपमधील विविध संस्थांना शिस्त लावल्यामुळेच.असा कृतज्ञतापुर्वक उल्लेखही त्यांनी केला.
            कर्नल निवृत्त शिवाजीराव बाबर म्हणाले ,वीर जवानाच्या दुर्लक्षित स्मारकाचे अपुर्ण काम पुर्ण करून समरजितसिंह घाटगे यांनी आजी माजी सैनिक व त्यांच्या त्याग व शौर्य यांचा सन्मानच केला आहे. 
        यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, रामचंद्र गोरुले, नामदेव गुडाळे, किरण किल्लेदार, अमोल पाटील उपस्थित होते. 
ए एच शिंदे यांनी  स्वागत व सूत्रसंचालन केले.  दत्तात्रय हातकर यांनी आभार मानले.








No comments:

Post a Comment