दाटे येथे तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीवरून दोन गटात वाद, धक्काबुकी, मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

22 October 2021

दाटे येथे तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीवरून दोन गटात वाद, धक्काबुकी, मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल

 


चंदगड /प्रतिनिधी :-- दाटे (ता. चंदगड)  येथे तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीवरून मुद्द्यावरील चर्चा गुद्यावर जाऊन वाद निर्माण होऊन धक्काबुक्की, मारहाणीचा प्रकार झाला. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी चंदगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार दाटे येथे सोमवारी (दि.१८ ऑक्टोबर रोजी) ग्रामसभा घेण्यात आली. त्यामध्ये तंटामुक्त समिती अध्यक्ष निवड करण्यात येणार होती मात्र अध्यक्ष निवडीवरून वाद निर्माण झाला. याप्रकरणी  राजू अनंत खरुजकर, धाकोबा गोपाळ गुरव व ज्ञानेश्वर हरि मोरे या तिघांविरोधात ग्रामसभा उधळून लावत तंटामुक्त अध्यक्ष निवड होऊ न देण्याचा उद्देशाने वाद निर्माण करत सरपंच, उपसरपंच, सदस्य याना धक्काबुक्की करून निवडीत अडथळा निर्माण केल्याची तक्रार दाखल केली आहे. याबाबत सरपंच अमोल महादेव कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. तर दुसऱ्या तक्रारीत, तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडणूक गुप्त पध्दतीने मतदान  घेण्यात यावी अशी मागणी केली असता इतर आरोपींनी धक्काबुक्की करत मारहाण केल्याची १७ जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.याप्रकरणी घनश्याम नाराण पाऊसकर, महादेव सावबा सातार्डेकर, मारुती गोपाळ किंदळेकर, महादेव भागोजी साबळे, ऋषिकेश गणपत सातार्डेकर, शाहु राणबा खरुजकर, लक्ष्मण गोविंद देसाई, संतोष महादेव मोरे, लक्ष्मण गोविंद देसाई यांची पत्नी, ताई शिवाजी गोरल, सरिता प्रकाश कांबळे व तेथे हजर असलेले इतर 3 पुरष व 3 महीला (सर्व रा. दाटे) यांच्या विरोधात धाकोबा गोपाळ गुरव यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेशकर करत आहेत.No comments:

Post a Comment