तावरेवाडीच्या अभिजितने पटकावले तीन गोल्ड मेडल , कोल्हापूरचा डंका कर्नाटक विद्यापीठात - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2021

तावरेवाडीच्या अभिजितने पटकावले तीन गोल्ड मेडल , कोल्हापूरचा डंका कर्नाटक विद्यापीठात

 


तेऊरवाडी  (एस .के. पाटील)

कर्नाटक विश्वविद्यालय धारवाडच्या ७१ व्या दिक्षांत समारंभात संख्याशास्त्र विषयातील सलग तीन गोल्ड मेडल जिंकण्याचा विक्रम तावरेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील अभिजित भरमू जाधव याने करून कोल्हापुरचा डंका कर्नाटक विद्यापिठात केला

             नेसरी - सांबरे रस्त्यावर असणाऱ्या या अगदी लहान असणाऱ्या तावरेवाडी गावात एका शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या अभिजित ने बुद्धीच्या जोरावर कर्नाटक विद्यापिठ गाजवले . संख्याशास्त्र सारख्या अत्यंत अवघड विषयामधील ते पण धारवाड सारख्या अत्यंत उच्च दर्जाच्या विद्यापिठातून पदवी घेताना या विषयातील सलग तीन गोल्ड मेडल जिंकून विक्रम केला .कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत , कर्नाटक राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री सी .एन. अश्वथनारायण , कर्नाटक विघापिठाचे कुलगुरू डॉ .के.बी 

गुडसी यांच्या हस्ते गोल्ड मेडल देवून अभिजितचा सन्मान करण्यात आला . यावेळी इस्रोचे चेअरमन , डीओएस चे सचिव व विक्रम साराभाईचे चे प्रोफेसर डॉ .ए.एस. किरण कुमार उपस्थित होते . अभिषेक 

प्रथम श्रेणीत परिक्षा उत्तीर्ण करत पुढील गोल्ड मेडल जिंकली .

1) Mangapur ugrana mathad Channabasaiah memorial gold medal

2) late professor J.N. Bagali gold medal

3) Professor B. Ramdas Bhat gold medal 

अभिजितला प्रा .एस.बी. मुनोळी , प्रा .एस.व्ही.. भाट , प्रा .ए.एस. तलवार , प्रा .एस. नागेश यांचे मार्गदर्शन लाभले. अभिषेकच्या या उज्वल यशाला चंदगड लाईव्ह न्यूज कडून अभिनंदन.



No comments:

Post a Comment