अर्जुनवाडी येथील १६०० मिटर धावण्याच्या स्पर्धामध्ये मळगेचा सुहास सावरतकर प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2021

अर्जुनवाडी येथील १६०० मिटर धावण्याच्या स्पर्धामध्ये मळगेचा सुहास सावरतकर प्रथम

 

मॅरेथॉन स्पर्धांचे उद्धाटन करताना दत्ता मोरे , तुकाराम देसाई , सागर कांबळे व मान्यवर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथे आज रविवार दि .१० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता १६०० मिटर धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धामध्ये मळगे (ता. कागल) येथील सुहास संजय सावरतकर याने प्रथम क्रमांक मिळवला .
         शिवप्रेमी गृपच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धा शिवप्रेमी चौक अर्जुनवाडी येथून सुरू करण्यात आल्या. यामध्ये ८१ स्पर्धकानी सहभाग घेतला . यासाठी अनुक्रमे  ३ हजार१, २ हजार १, १५०१, १ हजार१, ७०१, ५०१, ३०१, २०१, २०१ व १०१ अशी अनुक्रमे बक्षिसे ठेवण्यात आली होती.
अन्य विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे -
द्वितीय -सुशिल चौगुले (महागांव), तृतिय- विवेक मोरे (दाटे-चंदगड), चौथा -ऋषिकेश किरोठकर (धामोड), पाचवा -साहिल पाटील ( कोळींद्रे), सहावा -अनिकेत कुट्रे ( चंदगड), सातवा -अभिषेक देवडकर ( म्हाकवे), आठवा -विघ्नेश नाईक ( अर्जुनवाडी), नववा -निकेश नाईक (दाटे), दहावा -ओंकार पवार (अलबादेवी) या स्पर्धकानी यश संपादन केले. या स्पर्धां वेळी शिवप्रतिमा पूजन मंडळाचे अध्यक्ष सागर कांबळे यानी केले. 
उद्धाटन दत्ता चौरे  यानी केले. तुकाराम देसाई यानी फित कापून स्पर्धा चालू केली. परिक्षक   म्हणून कृष्णा पाटील यानी काम पाहिले. यावेळी शिवप्रेमी गृपचे सर्व कार्यकर्ते, पोलिस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments:

Post a Comment