![]() |
मदतनिधी राजू यांच्या आईकडे देताना कोवाड व्यापारी संघटनेचे पदाधिकारी. |
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील आजारी मित्र राजू होंगल यांना कोवाड व्यापारी संघटना यांच्याकडून 95,250/ रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
कोवाड बाझारपेठेत राजु होंगल यांचे राजश्री सायकल मार्ट हे सायकल रिपेयरींगचे दुकान आहे. कोरोना व महापुर यातुन सावरण्याआधीच पोटाच्या दुर्धर आजाराने राजूला ग्रासले. गेले दोन महिणे ते हाँस्पिटल मधे जिवनमरणाची लढाई लढत होते. ज्यावेळी ही बातमी कोवाड बाजारपेठेत समजली. त्यावेळी मनमिळावू व साधाभोळा राजू यातुन लवकर बरा झाला पाहिजेत आशी प्रत्येकाची भावना निर्माण झाली. त्याच्यासाठी आपण काहीतरी मदत केली पाहीजेत असे सगळ्यांना वाटत होते. कोवाड व्यापारी संघटनेच्या वतीने तसे मदतीचे अवाहन केले व दोन चार दिवसात बहुतांशी सर्व व्यापाऱ्यांनी व काही मित्रमंडळीनी मिळुन 95,250/ रूपयांचा मदतनिधी जमा केला. तो आज राजु व त्यांच्या आईंच्याकडे देण्यात आला. कोवाड व्यापारी संघटनेची ताकद आज राजू यांच्यापाठिशी खंबीरपणे उभी राहीली व त्यांना जगण्याची उभारी देवुन गेली. संघटनेची एकजुट व सर्वांनी एकमेकांना मदत करणे, एखाद्याला त्याच्या अडीअडचणीत मदत करणे यासाठी कोवाड व्यापारी संघटना नेहमीच तत्पर आहे. यापुर्वी सुद्धा अशाप्रकारे मदतनिधी जमा करून आजारी, अनाथ व गरजु लोकांच्या पाठीशी संघटना उभी राहीलेली आहे. मदतीसाठीच्या सोशल मेडीयावरील एका मेसेजवर सर्वजनानी कोणताही दुजाभाव न ठेवता एकत्र येऊन ही खुप मोठी मदत दिली. ही अभिमानास्पद बाब आहे. संघटनेची एकता अशीच अखंडीत राहुदेत व या सर्वांच्या सहकार्याबद्दल कोवाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम व सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार मानले. कोवाड व्यापारी संघटनेच्या या कार्याची खरचं समाजाने दखल घेणे गरजेचे आहे .
No comments:
Post a Comment