सोमवारी तलाठी संघटनेची तहसील कार्यालयासमोर निदर्शने, वाचा काय आहे कारण....... - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2021

सोमवारी तलाठी संघटनेची तहसील कार्यालयासमोर निदर्शने, वाचा काय आहे कारण.......चंदगड / प्रतिनिधी 

         ई-फेरफार, ई-चावडी व ई-पीक प्रकल्पाचे राज्य समन्वयक व उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी तलाठी संघटनेच्या पदाधिकारी यांच्याबद्दल केलेल्या अर्वाच्च व असंसदीय विधानाबद्दल व त्यांच्या या वागणुकीबाबत त्यांची राज्य समन्वयक पदावरून तात्काळ बदली करण्यात यावी. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघ शाखा चंदगड यांच्या वतीने पाठिंबा म्हणून उद्या ११ अक्टोबर रोजी चंदगड तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.  

         महाराष्ट्र राज्य संघ यांनी यासाठी आंदोलन सुरू केले आहे. याचा दुसरा टप्पा म्हणून राज्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर तलाठी निदर्शने करणार आहेत.यामध्ये चंदगड तलाठी संघ सहभागी होणार आहे.

अशी असणार निददर्शने

 १) ११ अक्टोबर रोजी तहसील कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत निदर्शने करणार.

२) १२ अक्टोबर रोजी तहसीलदार यांच्याकडे डी. एस. सी. जमा करणे.

३)  रामदास जगताप यांची राज्य समन्वयक पदावरून अन्यत्र बदली न झाल्यास १३ अक्टोबर रोजी पासून नैसर्गिक आपत्ती व निवडणूक कामे वगळता सर्व कामावर बहिष्कार
No comments:

Post a Comment