ईको केन ५ लाख गाळपाचा टप्पा पार करणार, बाॅयलर अग्निप्रदिपन प्रसंगी सतिश अनगोळकर यांचा विश्वास - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2021

ईको केन ५ लाख गाळपाचा टप्पा पार करणार, बाॅयलर अग्निप्रदिपन प्रसंगी सतिश अनगोळकर यांचा विश्वास

म्हाळुंगे (ता. चंदगड) येथील येथील इको केन शुगर एनर्जी  या साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदिपन उपाध्यक्ष सतीश अनगोळकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी, श्री. खराडे, के. के. जायकन्नावर,  धिरज दोड्डानावर, मधुसुदन प्रभाकर हुलजी ,भुषण देसाई.चंदगड / प्रतिनिधी (नंदकुमार ढेरे) 

        म्हाळुंगे खा. (ता. चंदगड) येथील इको केन शुगर एनर्जी या साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदिपन कार्यक्रम कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश अनगोळकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. स्वागत व्यावस्थापक बाबासाहेब देसाई यांनी केला.

         यावेळी श्री. अनगोळकर यांनी भागातील शेतक-यानी या वर्षी ११२०० हेक्टर इतकी विक्रमी ऊसाची नोंद कारखान्याकडे केलेली असुन झालेल्या विक्रमी नोंदिमुळे ५ लाख टन गाळपाचा टप्पा पार करणार असलेची भावना व्याक्त केली ते पुढे म्हणाले की भागातील तसेच तालूक्यातील शेतकऱ्यांनी कारखान्यावर नेहमीच विश्वास दाखवला आहे. येणाऱ्या गाळप हंगाम शासनाच्या मंत्री समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे सुरु केला जाईल. तसेच या वर्षी शासनांच्या धोरणाप्रमाणे वाढीव एफ. आर. पी. ची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना अदा केली जाईल. कारखान्यासाठी के. डी. सी. सी. बँकेकडुन अर्थसहाय्य उपलब्ध झाले असुन यासाठी बँकेचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. यावेळी जनरल मँनेजर के. के. जायकन्नावर, के. डी. सी. सी. बँकेचे स्थाई कोठार नियत्रंक श्री. खराडे यांनी मनोगत व्यक्त केली. आभार एच. आर. मँनेजर प्रभाकर रावळ यांनी मानले. यावेळी धिरज दोड्डानावर (व्हि पी केन) तुडीये व म्हाळगें खा गावचे सरपंच व सदस्य कारखान्याचे जनरल मँनेजर के. के. जायकन्नावर, शेती अधिकारी युवराज पाटील, चिफ इंजिनिअर सोलापुरे, अकाउंट मँनेजर प्रभाकर हुलजी, चिफ केमिस्ट खोत, कामगार प्रतिनिधी सर्व कामगार विभाग प्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment