चंदगड येथील न्यायालयात सहाय्यक अधीक्षक संजय सरनाईक यांचा बदलीनिमित्त निरोप - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2021

चंदगड येथील न्यायालयात सहाय्यक अधीक्षक संजय सरनाईक यांचा बदलीनिमित्त निरोप

सहाय्यक अधीक्षक संजय सरनाईक यांना बदलीनिमित्त निरोप देताना न्यायाधीश एस. सी. बिराजदार व सहन्यायाधीश सी. यु. शिपकुले. 

चंदगड / प्रतिनिधी

         चंदगड येथील न्यायालयात संजय सरनाईक १९ जुलै २०२१ रोजी सहाय्यक अधीक्षक म्हणून हजर झाले होते. ०७/१०/२०२१ रोजी सायंकाळी गारगोटी न्यायालयात पुर्वीच्या ठिकाणी बदली झाल्याबदल त्यांचा निरोप समारंभ करण्यात आला. यावेळी चंदगडचे न्यायाधीश ए. सी. बिराजदार व सहन्यायाधीश सी. यु. शिपकुले यांच्यावतीने निरोपाचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सर्व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. दिनांक ०८/१०/२०२१ रोजी चंदगड न्यायालयातील वकील वर्ग यांनी निरोप समारंभ केला. यावेळी अध्यक्ष जी. एन. दळवी व सर्व पदाधिकारी, वकील वर्ग हजर होता.

No comments:

Post a Comment