ज्ञानदीप वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

04 October 2021

ज्ञानदीप वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

जयंतीनिमित्त फोटोपूजन करताना मान्यवर.

चंदगड / प्रतिनिधी

        चंदगड येथील नविन वसाहत येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय मध्ये राष्ट्र पिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.                                                 चंदगड नगर पंचायतच्या नगरसेविका सौ नुरजहां नाईकवाडी व वाचनालयाच्या सभासद सौ. भाग्यश्री लेंडे यांच्या हस्ते द्विप प्रज्वलन  व फोटो पुजन करण्यात आले. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष आशिष कुतिन्हो, उपाध्यक्ष अनिल धुपदाळे, रिबिका कुतिन्हो, तसेच वाचक उपस्थित होते. या वेळी बारामती येथून चंदगड तालुक्यातील बोलीभाषेचा पी. एच. डी साठी अभ्यास करण्यासाठी आलेल्या सौ. लेंडे यांना निरोप देण्यात आला. शेवटी सौ. कुतिन्हो यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment