![]() |
सावित्री संतु कांबळे |
कालकुंद्री :सी एल वृत्तसेवा
मांडेदुर्ग (ता. चंदगड) नजिक ट्रक व दुचाकी अपघातात राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील सावित्री संतु कांबळे, वय ५९ या महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या.
याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, मयत सावित्री या मुलगा विशाल याच्यासह दुचाकीवरून हजगोळी, ता. चंदगड येथील आपल्या विवाहित मुलीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी परतताना मौजे कारवे व मांडेदुर्ग दरम्यान ओढ्या जवळील वळणावर कोवाड कडून वाळू भरून चाललेल्या भरधाव ट्रकची ( KA 22, B 3074) दुचाकीला धडक बसली. सावित्री खाली पडताच डोक्यावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. यावेळी जाणाऱ्या अन्य वाहनधारकांनी ट्रक थांबवला व मांडेदुर्ग पोलीस पाटील यांना माहिती दिली. या घाईत ड्रायव्हरने घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून वाळू वाहतूक करणा-या ट्रकचा मालक व ड्रायव्हरचा शोध पोलीस घेत आहेत. रात्री उशिरा पर्यंत शवविच्छेदन व अन्य प्रक्रिया सुरू होती.
सावित्री या राजगोळी बुद्रुक गावचे माजी सरपंच संतु यल्लाप्पा कांबळे यांच्या पत्नी तर कालकुंद्री येथील सेवानिवृत्त तलाठी पी के कांबळे यांच्या बहिण होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अधिक तपास चंदगड पोलिस करत आहेत.
No comments:
Post a Comment