![]() |
तहसीलदार विनोद रणवरे यांनी नागनवाडी शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. |
संपत पाटील / चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
कोरोना महामारी मुळे गेल्या १९ महिन्यांपासून बंद असलेल्या राज्यातील शाळा शासकीय निर्णयानुसार सोमवारी ४ ऑक्टोबर पासून अधिकृत रित्या सुरू झाल्या. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी तर शहरी भागातील आठवी ते बारावी चे वर्ग सुरू झाले. मास्क, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर, एका बेंचवर एक विद्यार्थी हे नियम सर्वांना बंधनकारक राहणार आहेत.
![]() |
जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांनी चंदगड येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. |
![]() |
पं. स. सभापती अनंत कांबळे यांनी कानडी शाळेत स्वागत केले. |
बहुतांशी जि प. शाळांत १०० टक्के उपस्थिती दिसून आली अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना शासनाबरोबरच विविध संस्था, दानशूर व्यक्तींकडून मास्क, सॅनिटायझर आदी सुरक्षा साधने 'वेलकम किट' पुरवण्यात आली.
![]() |
शिक्षक आमदार जयंत आसगावकर, गटशिक्षणाधिकारी सौ सुभेदार, गडहिंग्लज पंस. सदस्य विद्याधर गुरबे यांनी अडकूर शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. |
पहिल्याच दिवशी तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार, पंचायत समिती सभापती ॲड. अनंत कांबळे, जि प सदस्य सचिन बल्लाळ, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, विद्याधर गुरबे आदींसह सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध शासकीय विभाग प्रमुखांनी शाळांत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, संस्थाचालक, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यात उत्साह दिसून आला.
No comments:
Post a Comment