तिराळी धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याला मणेरी धनगरवाडी येथे भगदाड, अनेकांच्या जमीनीत शिरला पाण्याचा प्रवाह - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2021

तिराळी धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याला मणेरी धनगरवाडी येथे भगदाड, अनेकांच्या जमीनीत शिरला पाण्याचा प्रवाह

तिराळी धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याला मणेरी धनगरवाडी येथे भगदाड पडल्याने अनेकांच्या जमीनीत शिरला पाण्याचा प्रवाह, लाखोचे नुकसान.

दोडामार्ग / सी. एल. वृत्तसेवा

महाराष्ट्र गोवा राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिराळी धरणाच्या डाव्या कालव्याला गेल्या जानेवारी महिन्यात साटेली भेडशी खानयाळे येथे भगदाड पडल्याची घटना ताजी असतानाच 

रविवारी पहाटे तीन चार च्या सुमारास मणेरी धनगरवाडी किलोमीटर सतरा येथे एका नाल्यावर पाईप टाकून त्यावर मातीचा भराव टाकून केलेल्या डाव्या मुख्य कालव्याला भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह लोकांच्या शेती काजू बागायती मध्ये शिरला. त्यामुळे तिलारी कालव्याच्या बोगस कामांचा शिलशिला पुन्हा समोर आला आहे.गेल्या तीस वर्षांत दूरुस्ती नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च दाखवला पण प्रत्यक्षात जाग्यावर काही नाही हे समोर आले आहे.कालवा फुटल्याने गोवा राज्यात होणारा पाणीपुरवठा पुन्हा बंद झाला आहे.ही घटना समजताच संबंधित अधिकारी तसेच महसूल विभाग अधिकारी कर्मचारी यांनी भेट दिली तसेच तातडीने पाणी पुरवठा बंद केला आहे.

   तिलारी धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याच्या बांधकामांना अनेक वर्षे झाली आहेत.पण याची देखभाल दुरुस्ती केली नाही त्यामुळे दोन्ही कालवे अखेरच्या घटका मोजत आहेत.गोवा सरकारने आपल्या हद्दीत कालव्याची कामे पारदर्शक केली आहेत अशी करावी अशी मागणी करुन देखील याकडे संबंधित अधिकारी यांनी दूर्लक्ष केले ठेकेदार अधिकारी यांच्या संगनमताने तिलारी कालवा दूरूस्ती नावाखाली कागदोपत्री खर्च दाखवला जातो त्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

   तिलारी धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याच्या ठिकाणी अनेक ठिकाणी पावसाळ्यात डोंगर खचून येणे अनेक ठिकाणी कालवे कोसळून पाणी पुरवठा बंद होणे हेच प्रकार घडलेले होते त्यामुळे पावसाळ्यात काही महिने पाणी पुरवठा बंद ठेवला होता.नंतर यांञिकी विभाग यांनी मशिनरी लावून कालव्यात पडलेली माती बाजूला करून पाणी पुरवठा सुरू केला होता.

      मणेरी धनगरवाडी येथे गळती सुरू असलेल्या ठिकाणी भगदाड

   तिलारी डावा मुख्य कालवा जो कुडासे मणेरी दोडामार्ग केळीचेटेंब आंबेली गोवा असा गेला आहे.या कालव्यात म्हावळणकरवाडी येथे कालवा कोसळला होता.पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती.तर मणेरी धनगरवाडी येथे रविवारी पहाटे भगदाड पडले तेथे गळती सुरू झाली होती.याची माहीती स्थानिक शेतकरी तसेच केळी अननस लागवड केलेल्या परप्रांतीय यांनी दिली होती.पण संबंधित शाखा अभियंता यांनी याकडे दुर्लक्ष केले.आणि याचा फटका बसला.

    मणेरी धनगरवाडी येथे एक लहान नाला आहे.यावर एक मोरी बांधून यावर माती भराव टाकून हा कालवा तयार केला होता.येथून गळती सुरू होती याच ठिकाणी हा कालवा रविवारी पहाटे फुटला सकाळी काही शेतकरी गुरांना घेऊन जाताना तसेच अचानक पाऊस नसताना नाला जमीन काजू बागायती मध्ये पाणी वाढले कसे तेव्हा कालवा फुटला हे लक्षात आले. नंतर हालचाली सुरू झाल्या.

   तिलारी डाव्या मुख्य कालव्यातून पाणी पुरवठा बंद केला.

 मणेरी येथे कालवा फुटताच मातीचा भराव वर वाढलेल्या झाडीसह खाली कोसळत राहिला . पाणी प्रवाह मोठा होता त्यामुळे भराव भाग पन्नास ते साठ मीटर खाली कोसळला त्यामुळे तिलारी येथील कर्मचारी यांनी फोनाफोनी करून तातडीने पाणी बंद करायला  कळविले . पाणी बंद केले तरी दहा वाजेपर्यंत कालव्यातून पाणी सुरु होते. अकरा वाजण्याच्या सुमारास पाणी कमी झाले.

No comments:

Post a Comment