घुल्लेवाडी ग्रामपंचायतीकडून विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

07 October 2021

घुल्लेवाडी ग्रामपंचायतीकडून विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर वाटप

घुल्लेवाडी ग्रामपंचायतीकडून विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर वाटप

 
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
          कोरोना महामारीमुळे तब्बल दीड वर्षे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. तथापि कोरोना अद्याप संपलेला नाही. त्याने पुन्हा डोके वर काढू नये. यासाठी खबरदारी उपाय म्हणून ग्रामपंचायत घुलेवाडी, ता. चंदगड मार्फत मराठी वि.मं.घुल्लेवाडी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.  सरपंच युवराज पुनाजी पाटील, ग्रामसेवक नीलकंठ सांबरेकर, मुख्याध्यापक नारायण कोकितकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, जेष्ठ नागरिक महादेव पाटील, शिवाजी पाटील, पालक उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापक नारायण कोकितकर यांनी केले. अध्यापक रामचंद्र तोगलेकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment