सुरेश नाईक |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
शिवसेना
प्रणित महाराष्ट्र राज्य सहकार सेनेच्या चंदगड तालुका संघटकपदी
कालकुंद्री, ता. चंदगड येथील सुरेश सट्टूपा नाईक यांची निवड करण्यात आली
आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्य
अध्यक्ष शिल्पा सरपोतदार यांनी निवडीचे पत्र नाईक यांना दिले.
कोल्हापूर
येथे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड पत्र
वितरण कार्यक्रमात संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांच्या हस्ते सुरेश नाईक
यांना निवड पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार,
मुरलीधर जाधव, सहकार सेना गडहिंग्लज तालुका संघटक अखलाकभाई मुजावर, करवीर
तालुका संघटक संजय जाधव व जिल्ह्यातील पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
सुरेश
नाईक हे कालकुंद्री ग्रामपं. चे माजी उपसरपंच तसेच नाईक बेरड- रामोशी समाज
सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य सचिव आहेत. ग्रामपंचायतचे उपसरपंच व काही
काळ सरपंच राहिलेल्या नाईक यांनी पदासाठी मिळणारा भत्ता स्वतःसाठी न वापरता
गावातील वाचनालयाला पुस्तके तसेच सामाजिक कार्यासाठी वापरला. यातून
त्यांची निस्वार्थी वृत्ती दिसून येते. त्यांच्या निवडीबद्दल विविध
स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment