तिलारीच्या माऊली विद्यालयाला पुस्तके भेट - चंदगड लाईव्ह न्युज

30 October 2021

तिलारीच्या माऊली विद्यालयाला पुस्तके भेट

 तिलारीच्या माऊली विद्यालयाला पुस्तके भेट देताना सामाजिक कार्यकर्ते धोंडीबा दळवी व इतर. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          तिलारीनगर (ता. चंदगड) येथील श्री माऊली विद्यालयाला कळसगादे येथील सामाजिक कार्यकर्ते धोंडीबा दळवी यांनी पुस्तके भेट दिली. संचालक तुषार गावडे व ग्रंथपाल निंगु दळवी यांच्या हस्ते पुस्तके संच भेट दिली. यावेळी धोंडीबा दळवी यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी उपाध्यक्ष तुप्पट, संचालक आवडण, नारायण गावडे, बी. व्ही. चिंचणगी तसेच मुख्याध्यापक सातार्डेकर आदीसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment