हलकर्णी फाट्यावर आठवडा बाजार भरवणार, हलकर्णी ग्रामपंचायतीचा ग्रामसभेत ठराव - चंदगड लाईव्ह न्युज

30 October 2021

हलकर्णी फाट्यावर आठवडा बाजार भरवणार, हलकर्णी ग्रामपंचायतीचा ग्रामसभेत ठराव

हलकर्णी (ता. चंदगड) येथील ग्रामसभेदरम्यान सरपंच राहूल गावडे,उपसरपंच रमेश सुतार, ग्रामविकास अधिकारी दयानंद मोटूरे व सदस्य

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       हलकर्णी (ता. चंदगड) येथील ग्रामसभा सरपंच राहूल गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

         प्रारंभी ग्रामविकास अधिकारी दयानंद मोटूरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून विषय सूची वाचन करून सभेला सुरुवात केली. हलकर्णी फाट्यावर आठवडा बाजार भरवणे, पाणंद रस्ते खुले करणे, MRGS आराखडा तयार करणे, जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा करणे, महात्मा गांधी तंटामुक्त समिती गठीत करने याबाबत इत्यादी विषयावर सभेत चर्चा करण्यात आली. तसेच दौलत सहकारी साखर कारखान्याकडील ग्रामपंचायतीला येणे असलेल्या ७१ लाख  थकीत  रकमेबाबत त्रिस्तरीय करारामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्वांविरुद्ध कोर्टात दावा दाखल करून वसुली करणेचे ठरले. माजी सरपंच एकनाथ कांबळे, माजी तंटामुक्त अध्यक्ष सुरेश गायकवाड, सुरेश सुतार, भुजंग नाईक, परशराम सावंत, मारुती सावंत, चंद्रकांत कडूकर, नारायण सांबरेकर यांनी सभेत सहभाग घेतला.  उपसरपंच रमेश सुतार, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश सावंत, लक्ष्मण सुभेदार, धोंडीबा नाईक, सौ. रचना गावडे, सौ. शोभा पाटील, सौ कमल केसरकर, सौ. शोभा कार्वेकर, कृषी सहायक जीवन पालमपल्ले, तलाठी इकबाल तांबोळी, पोलीस पाटील अंकुश गुरव यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment