महागाव येथील संत गजानन महाविद्यालयाचे डॉ. शिवकांत पाटील वनौषधी विद्यापीठाच्या आयुर्वेद एक्सलन्स् गोल्ड मेडलने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

18 October 2021

महागाव येथील संत गजानन महाविद्यालयाचे डॉ. शिवकांत पाटील वनौषधी विद्यापीठाच्या आयुर्वेद एक्सलन्स् गोल्ड मेडलने सन्मानित

डॉ. शिवकांत पाटील यांचा गौरव करताना गृहराज्यमंत्री ना. सतेज पाटील, शेजारी डॉ. सुनिल पाटील, दिलीप लोढें.....

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयाचा अधिव्याख्याता व आयुर्वेदतज्ञ डॉ. शिवकांत पाटील यांना कोल्हापूर येथील वनौषधी विद्यापीठाच्या ‘युथ एक्सलन्स् इन आयुर्वेद रिसर्च – गोल्ड मेडल अॅवॉर्ड’ने  सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे गृह, परिवाहन व संसदीय कार्य राज्यमंत्री ना. सतेज पाटील यांच्या हस्ते सुवर्णपदक, मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन डॉ. पाटील यांचा गौरव झाला. कोल्हापूर येथील पंचतारांकित ‘हॉटेल सयाजी’ मध्ये हा सन्मान सोहळा पार पडला. 

         वनौषधी विद्यापीठ या आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसार कार्यात अविरत कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरातील निवडक तज्ञांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात आयुर्वेद वैद्यक क्षेत्रातील संशोधन कार्याकरिता डॉ शिवकांत पाटील यांना गौरविण्यात आले. डॉ पाटील यांनी मानसिक ताणतणाव व वंध्यत्व यांचा परस्परसंबंध, छातीच्या कर्करोगाचे प्रतिबंधक उपाय, पवनमुक्तासनाचा बद्धकोष्ठतेमध्ये लाभ, मधुमेहाकरिता योगचिकित्सा, आयुर्वेदशास्त्रानुसार आहार आणि पोषण  इ. विषयांवर यशस्वी संशोधन केले आहे. याचा लाभ आजवर पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो रुग्णांना झाला आहे.

          या सन्मान सोहळ्यास पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, वनौषधी विद्यापीठाचे संस्थापक वैद्य सुनील पाटील, ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोंढे, १०८ अॅम्ब्युलन्स सेवेचे झोनल मॅनेजर डॉ. अरुण मोराळे, श्री अण्णासाहेब डांगे आयुर्वेद महाविद्यालय आष्टाचे प्राचार्य डॉ. अशोक वाली, डॉ.ऋषिकेश जाधव,डॉ.प्रणव पाटील उपस्थित होते.या यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. आण्णासाहेब चव्हाण, प्राचार्य डॉ. मंगल मोरबाळे, विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण, डॉ.  संजय चव्हाण  यांनी अभिनंदन केले.


No comments:

Post a Comment