माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

06 October 2021

माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना जयंतीनिमित्ति नम्र अभिवादन करण्यात आले. 

        राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहानिमित्त विविध विषयांवर प्रबोधनात्मक उपक्रम राबवून स्वच्छ भारत ऊभियानाचा संदेश सर्वांच्यापर्यंत  पोहोचविण्यात आला.  प्रतिमा पूजन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील व प्रा. एस. के. सावंत यांच्या हस्ते झाले. कु तय्यबा मुल्ला व नामदेव चांदेकर यांनी मनोगते व्यक्त केली. प्रकल्प अधिकारी प्रा. संजय पाटील यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रा. व्हि. के. गावडे, डाॅ. एन. के. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी एन. एस. एस. चे सर्व स्वयंसेवक व महाविद्यालयाचा सर्व स्टाफ उपस्थित होता. उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या स्वयंसेवकांचे स्वागत करण्यात आले. प्रा. ए. डी. कांबळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment