ऊस दरासंदर्भात व एफ. आर. पी. संदर्भात शेतकऱ्यांच्या भावना त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि २० व्या ऊस परीषदेच्या तयारीसाठी संघटनेचे नेते राजू शेट्टी याची जाहिर सभा रविवार १७ आक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वा अमरोळी ता चंदगड येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला प्रमुख उपस्थित राजेंद्र गड्डयानावर उपस्थित राहणार आहेत. कोरोना, महापूर यामुळे तालुक्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. सरकार, कारखानदार यांनी संगनमताने एफ. आर. पी. बाबत टप्पे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकरकमी दरासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी ऊस उत्पादक शेतकरी, भगिनीनी उपस्थित रहावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांनी केले आहे.
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
No comments:
Post a Comment