ओलम (हेमरस) साखर कारखाना 31 ऑक्टोबरपर्यंत गाळप झालेल्या ऊसाची बिले एकरकमी 2 नोव्हेंबरला जमा करणार - बिझनेस हेड भरत कुंडल यांची माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

01 November 2021

ओलम (हेमरस) साखर कारखाना 31 ऑक्टोबरपर्यंत गाळप झालेल्या ऊसाची बिले एकरकमी 2 नोव्हेंबरला जमा करणार - बिझनेस हेड भरत कुंडल यांची माहिती

 

राजगोळी (ता. चंदगड) येथील ओलम शुगर

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

राजगोळी खुर्द-चनेहट्टी (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) ऍग्रो इंडिया प्रा.लि. साखर कारखाना प्रशासनाकडून १२ व्या गळीत हंगामातील ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यत गाळप झालेल्या ऊसाची बिले ही संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दीपावली सणाचे औचित्य साधून प्रति टन एकरकमी २९२५ रु प्रमाणे दिनांक २ नोव्हेंबर २०२१ रोजी जमा करणार असल्याची माहिती कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी दिली.

बिझनेस हेड भरत कुंडल

      १२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी १४ रोजी प्रमुख मान्यवरांच्या व शेतकऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आला होता. त्याच दिवशी कारखाना प्रशासनाच्या वतीने प्रतिटन एकरकमी २९२५रु. दर जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले होते.

यावेळी प्रतिनिधींशी बोलताना कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल म्हणाले, "दीपावली सण तोंडावर असताना ऑक्टोबरपर्यंत गाळप झालेल्या ऊसाची बिले अदा करत असल्याचे जाहीर करत असून सध्या शेतकरी ,ऊस तोडणीदार, वाहतूकदार आणि कामगार यांच्या सहकार्याने प्रतिदिन ५००० मेट्रिक टनाच्या क्षमतेने कारखाना पूर्ण क्षमतेने चालू आहे.त्यामुळे यंदाच्या वर्षीचे सात लाखावर गाळपाचे उद्दिष्ट आम्ही नक्कीच यशवलीरित्या पूर्ण करू.प्रशासनाकडून जाहीर केलेला दर हा गडहिंग्लज विभागातील उच्चांकी दर आहे यावेळी त्यांनी सर्वाना दीपावलीच्या शुभेच्छा देत यापुढे देखील अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली."




No comments:

Post a Comment